The Supreme Court should take immediate notice of the bloody incident in Maharashtra

महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो दखल घ्यावी – गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांच्याच मतदार संघात व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई’ जवळच्या उल्हासनगर(ठाणे) येथील “पोलीस स्टेशन”मध्ये शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना राज्यातील अराजकता दर्शवणारी व कायदा – सुव्यवस्था लयास गेल्याचे सिध्द करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आमदार गायकवाडांचे ‘गुन्हेगारी वाढवत असल्याचे’ व ‘कोट्यावधीं रुपये घेतल्याचे’ केलेले जाहीर आरोप व गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्राची प्रतीमा देशात मलींन झाली असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केली. “महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची संविधान रक्षक सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घ्यावी’ असे विनंती वजा साकडे पुणे शहरातील जेष्ठ काँग्रेसजनांतर्फे घालत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगितले.(The Supreme Court should take immediate notice of the bloody incident in Maharashtra)

तिवारी म्हणाले, केवळ सत्तेच्या लालसेने असंविधानीक व अनैतिक कृतीने एकत्र आलेल्या ‘त्रिकुट सरकारच्या काळात’ अराजकतेची परीसीमा ओलांडली जात आहे. ‘संतांच्या आणि शिव छत्रपतींच्या’ भूमीत घडणाऱ्या अशा घटना ‘महाराष्ट्रावर’ कलंक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था लयाला गेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरील आरोप गंभीर आहेत. आमदार गणपत गायकवाडांच्या आरोपांची न्यायालयीन सुमोटो चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्राचा देशातील प्रथम क्रमांक, राज्याची विकासात्मक प्रगती, राज्यात नांदणारी शांतता, सामाजिक सलोखा हे मोदी-शहांना सहन होत नव्हते की काय?  ज्या योगे भाजपने मविआ सत्ता पक्षांत फुट पाडून ‘भ्रष्टाचारी म्हणून ईडी कारवाई लावलेल्यांच्या हातीच सत्ता सोपवल्याने, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून राज्यास ड्रग माफीया बनवून, राज्याची बदनामी करण्याचा घाट मोदी-शहांच्या भाजपने घातला आहे काय?  असा संतप्त सवाल तिवारी यांनी उपस्थित केला.  

महाराष्ट्राच्या आजवरच्या ईतिहासात, कायदा – सुव्यवस्था आणि गुंडशाही एवढ्या खालच्या पातळीवर गेल्याचे पहील्यांदा पहावयास मिळत असून या परीस्थितीस सर्वस्वी मोदी – शहा – फडणवीसांचा भाजप जबाबदार असल्याचे ते म्हणाले. ‘भाजप आमदार आणि शिंदे-सेना यांच्यातील संपत्ती, पैसा व मालमत्तेचा वाद’ सत्तेतील वर्चस्वासाठी होत असलेला संघर्ष दर्शवत असून मोदी-शहा महाराष्ट्रावर कोणता सुड उगवत आहेत? अशी पुस्तीही  ही त्यांनी जोडली.

राज्यातील बेकारीचा व गुन्हेगारीचा दर ऐतिहासीक वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी गृहमंत्रालयावर मुंबई उच्च न्यायालयानेही कडक ताशेरे ओढले होते, याकडे लक्ष वेधत आज पर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्रास प्रथम क्रमांकावर नेण्यात काँग्रेस सरकारांचे अतुलनीय योगदान असुन संविधान रक्षक न्यायालयाने पावले न ऊचलल्यास काँग्रेस जन आंदोलन उभारणार असल्याचे ऊपस्थित काँग्रेसजनांनी सांगितले.

भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर टीका करताना गोपाळदादा म्हणाले, ”भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कसे म्हणतात की भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्व – संरक्षणार्थ गोळीबार केला होता. भाजप नेत्याकडून आलेले हे धक्कादायक विधान आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या ही नुकत्याच झालेल्या विधानाचा संदर्भ देऊन काँग्रेसने जोरदार टीका केली, आमदार राणे यांनी जाहीर सभेतच भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना आणि चिथावणी देताना ‘पोलिसांची तमा न बाळगता हवे ते पाऊल उचला, कारण ‘आमचे बॉस गृहमंत्री फडणवीस तिथे सागर बंगल्यावर बसले असल्याचे जाहीर, चिथावणीखोर विधान केले. भाजपचे एक आमदार राम कदम यांनी देखील दही-हंडी कार्यक्रमात ‘तुम्हाला कोणती मुलगी आवडली ते आम्हाला सांगा, तिच्या कुटुंबाच्या इच्छेचा विचार करू नका’ हे कार्यकर्त्यांना खूलेआम सांगितले होते. हे सर्व प्रकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे आहेत टीका गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी केली.

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा ही काँग्रेसने निषेध केला आहे. आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा महिलां विरोधात वापरणे ही संस्कृती भाजप महाराष्ट्रात आणू पाहत आहेत.

या पत्रकार परीषदेस जेष्ठ काँग्रेसजन श्री मधूभाऊ सणस, रामचंद्र (भाऊ) शेडगे, सुभाषशेठ थोरवे, संभाजीराव पायगुडे, पै आबा पवार, नंदूशेठ पापळ, आबा जगताप, प्रसन्न पाटील, सुरेश नांगरे, नितीन पायगुडे, धनंजय भिलारे, आण्णा गोसावी, पै शंकर शिर्के, संजय अभंग, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, योगीराज नाईक, आशिश गुंजाळ, गणेश मोरे, मंगेश थोरवे, राजेश सुतार, ऊदय लेले, नरेश आवटे, शंकर थोरवे, संभाजी वाघ इ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते.

पंतप्रधानांनी सत्य बोलावे.. वास्तवतेवर बोलावे.. अपेक्षीत असतांना पंतप्रधान आपल्या पदाची महती व गरीमा कमी करत केवळ काँग्रेसवर पातळी सोडूनची टीका व ऊणी – दुणी काढत, गरळ ओकत बसले. ज्या काँग्रेसला व नेहरू – गांधी नेत्यांना जनतेने वारंवार निवडुन दिले. काँग्रेस ने ऊभारलेल्या वैज्ञानिक, संगणक व विकासात्मक पायावर मोदी पुढील वाटचाल करत आहेत.. ज्या विकासात्मक देश ऊभारणीचा माजी पंतप्रधान स्व अटलजी वाजपेयी व स्व सुषमा स्वराज यांनी युनोत ऊलेलेख केला.. देशाच्या माजी नेत्यांच्या वक्तव्यांना खोटे ठरवण्याचा बालीश, खोडसाळ व निंदनीय प्रयत्न मोदींनी करून, देशाप्रती एक प्रकारे कृतघ्नता दर्शविल्याचे ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *