‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावले

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

पुणे -पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले.  

पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ अशी हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धा  गेले ८ वर्षे भरविली जाते.यंदाचे ९वे वर्षे आहे. १५ ते ४० आणि ४१ व पुढील वयोगटातील महिला व पुरूष अशा ४ गटात ही  स्पर्धा घेतली जाते. शनिवार दि. २७ ऑगस्ट व रविवार दि. २८ ऑगस्ट असे २ दिवस सकाळी १० पासून संध्याकाळी ७ पर्यंत कराओके ट्र्ँक्सवर या स्पर्धांची प्रथम फेरी हार्मनी स्टुडिओ, डेक्कन येथे घेतली गेली. यंदाच्या  वर्षी ४ ही वयोगटात मिळून १६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदाचे वर्षी ही नेहमीप्रमाणे नगर, मुंबई, व बीड अशा ठिकाणांहून स्पर्धक आले होते.

संगीत विशारद, पं. किरण परळीकर,डाँ. विद्याताई गोखले,संगीत विशारद सौ. सीमाताई येवलेकर व झी सारेगमपचा प्रथम विजेता व आजचा नामवंत गायक मंगेश बोरगांवकर अशा ४ शास्त्रीय संगीत विशारद व तसेच सुगम संगीतामधील तज्ञ परिक्षकांनी परिक्षण केले.

सूर, ताल, प्रेक्षकांचा प्रतिसाद, व सादरीकरण अशा प्रमाणे विभागून गूण दिले गेले. १६० स्पर्धेकांमधून एकूण ३० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. अंतीम फेरी दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधे वाद्यवृदांसहित संपन्न झाली. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला प्रारंभ झाला. यावेळी या स्पर्धेच्या संयोजक अॅड. अनुराधा भारती, प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक निलेश नवलाखा, प्रिंट मिडिया प्रायोजक, रोहन अंतापूरकर, हाँटेल राजेशाहीचे निलेश दमीष्टे, परीक्षक मंगेश बोरगावकर, पं. किरण परळीकर आणि अतुल गोंजारी उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *