सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एनसीसीच्या विस्ताराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी


173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेणार;एकूण संख्येपैकी एक तृतीयांश असणार मुली

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांत एनसीसीचा विस्तार केला जाईल अशी घोषणा केली होती. त्याची आज तत्काळ अंमलबजावणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. नॅशनल कॅडेट कोअरच्या (एनसीसी) 173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील विस्ताराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.  या अंतर्गत 73 सीमावर्ती आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेतले जाईल त्यापैकी एक तृतीयांश मुली असतील.

अधिक वाचा  कॅप्टन दीपक साठे आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून आईला देणार होते ‘सरप्राईज’

मोदी यांनी एनसीसीच्या सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यातील विस्तार केला जाईल अये सांगताना त्यामुळे नैसर्गिक आपत्तीतील व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि सशस्त्र दलांमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी युवकांना या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होईल, असे त्यांनी भाषणात सांगितले होते.

विस्तारीकरणाच्या मोठ्या योजनेचा एनसीसीने पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. सीमावर्ती आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक हजार शाळांची ओळख पटवण्यात आली असून, तिथे एनसीसी सुरू केली जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, याअंतर्गत 173 सीमावर्ती आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेतले जाईल. या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश मुली असतील. विस्तारीकरण योजनेनुसार एनसीसीच्या एकूण 83 केंद्रांचे आधुनिकीकरण केले जाईल. यामध्ये लष्कराचे 53, नौदलाचे 20 आणि वायुदलाचे 10 विभाग असतील. याअंतर्गत सीमा व तटवर्ती भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. सीमावर्ती भागातील एनसीसी केंद्रांना प्रशासकीय आणि प्रशिक्षणासाठी लष्कराकडून सहकार्य केले जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love