पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

कला-संस्कृती राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–प्रख्यात शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी दुख:द निधन झाले. कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन नंतर ते न्यू जर्सी येथेच होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या निधनाची वार्ता कळताच संगीतप्रेमींमध्ये शोकाची लाट पसरली.  सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्वीटरवर शोक व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंडित जसराज यांच्या कुटुंबीयांनी प्रसिध्द केलेया निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. आम्हाला अत्यंत दु:खाणे कळवावे लागत आहे की,  “संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांचे आज सकाळी 5.15 वाजता अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

 ते पुढे म्हणतात, आम्ही अशी प्रार्थना करतो की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचे स्वर्गातील प्रवेशद्वारात स्वागत करावे जेथे ते आपले आवडीचे भजन ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ त्यांना समर्पित करतील. आम्ही त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. आपल्या प्रार्थना धन्यवाद. जय बापूजी.

यंदा जानेवारीत आपला ९० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या  पंडित जसराज यांनी एप्रिल महिन्यात  ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून हनुमान जयंतीनिमित्त वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिरासाठी आपले शेवटचे सादरीकरण केले होते.

ख्याल गायकीचे शीर्षस्थ गायक

मेवाती घराण्याचे पंडित जसराज हे ख्याल गायकीचे शीर्षस्थ गायक होते. त्यांच्या बंदिशी अत्यंत लोकप्रिय आहेत.  त्याचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथेही एक घर आहे. त्यांचे तिथे त्यांचे संगीत विद्यालयही आहे.

जसराज हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायकांपैकी एक होते. ते जसराज मेवाती कुटूंबाशी संबंधित होते. वडील पंडित मोतीराम यांचे निधन झाले तेव्हा जसराज चार वर्षांचे होते. त्यांचे मोठे बंधू   पंडित मनिराम यांनी त्यांचा सांभाळ केला.

 पं. जसराजने शास्त्रीय संगीत क्षेत्रात 80 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय गाण्यांचा अल्बम आणि   ध्वनीचित्रही करण्यात आली आहे. जसराज यांनी भारत, कॅनडा आणि अमेरिकेत शास्त्रीय संगीताचे धडे आपल्या शिष्यांना दिले आहेत. त्यांचे काही शिष्य प्रख्यात संगीतकारही बनले आहेत.

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 मध्ये शोधलेल्या निकृष्ट हीन ग्रह  2006 व्हीपी 32 (क्रमांक-300128) याला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ ‘पंडितजसराज’ असे नाव देण्यात आले होते.

 राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्वीट करत   ‘संगीत दिग्गज आणि अनोखे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन झाल्याने मला दु: ख झाले आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंडित जसराज यांनी आठ दशकांपेक्षा अधिक काळ कारकीर्द घडवून आणून लोकांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि संगीतासाठी शोक व्यक्त करतो. ‘

 शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘पंडित जसराजजी यांच्या दुर्दैवी निधनाने भारतीय सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे सादरीकरण उत्कृष्ट तर होतेच मात्र त्यांनी इतर अनेक गायकांसाठी   असाधारण गुरु म्हणूनही आपला एक ठसा उमटविला. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांप्रती संवेदना..ॐ शांती ‘

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *