भाजपची प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर; पडळकर आणि महाडिक यांना पक्षाकडून मोठ्या पदाचे ‘गिफ्ट’


मुंबई – विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना थेट बारामतीत आव्हान देणारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर जोरदार टीका झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी असलेले, मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना पक्षाकडून आणखी एक गिफ्ट मिळाले आहे. पडळकर यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

लोकसभेत पडळकर यांनी वंचित विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत भाजपच्या विरोधात विरोधात प्रचार केला होता. मात्र ऐन विधानसभेवेळी भाजपात येऊन थेट बारामतीमध्ये अजित पवारांना आव्हान दिले होते. मात्र, त्यांचे डीपॉझीट जप्त झाले होते. मात्र,  गोपीचंद पडळकर यांना असलेला धनगर समाजाचा पाठिंबा बघता भाजपने त्यांना विधान परिषदेची आमदारकी  दिली होती आता आणखी एक जबाबदरी देत पडळकरांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे 'पदवीधर' निवडणूक:भाजप गड राखणार का?

दरम्यान,  लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार धनंजय महाडीक यांची देखील पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

भाजपा प्रदेश अध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून आज  १०  प्रवक्ते व ३३चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्ता – श्री.केशव उपाध्ये

प्रवक्ता

खा.भारती पवार – उत्तर महाराष्ट्र,

आ‍.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,

आ. राम कदम मुंबई,

शिवराय कुलकर्णी विदर्भ,

एजाज देखमुख मराठवाडा,

भालचंद्र शिरसाट मुंबई,

धनंजय महाडीक प. महाराष्ट्र,

राम कुलकर्णी मराठवाडा,

अधिक वाचा  #Sunetra Pawar : अन् .. सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर झाले..

श्वेता शालिनी पुणे,

अॅड. राहुल नार्वेकर मुंबई.

 पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य –

गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.

मीडिया सेल सदस्य – देवयानी खानखोजे

राज्यातील विभागवार प्रवक्ते पदांची आज नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानुसार खा.भारती पवार – उत्तर महाराष्ट्र, आ‍.गोपीचंद पडळकर आणि धनंजय महाडीक – पश्चिम महाराष्ट्र, आ. राम कदम – मुंबई, शिवराय कुलकर्णी – विदर्भ, एजाज देखमुख – मराठवाडा, भालचंद्र शिरसाट – मुंबई, राम कुलकर्णी – मराठवाडा, श्वेता शालिनी – पुणे, ऍड. राहुल नार्वेकर – मुंबई  यांची निवड करण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्याला कोरोना लशीचे १९.५ लाख डोस मिळणार : खा. गिरीश बापट

यासोबतच, पॅनेलिस्ट म्हणून गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love