नाव राणे मात्र चर्चा चार आण्याची : अब्दुल सत्तार


पुणे- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? बाळासाहेब ठाकरेंनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवले पाहिजे. पण ते विसरले, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. भाजपा आमच्या सोबत होता तोपर्यंत ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. मात्र आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत. याचे भान भाजपने ठेवले पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.

अधिक वाचा  अखेर ठरलं : हार्दिक पटेल 2 जूनला करणार भाजपात प्रवेश : जाणून घ्या हार्दिक पटेल विषयी सर्वकाही

राणे आगळ्यावेगळ्या भाषेत बोलले खरे मात्र शिवसैनिक त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देतील. त्यांनी त्याची भाषा वेळीच सुधरवली पाहिजे असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love