युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे : राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सरचिटणीस अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, मध्यप्रदेश प्रभारी ऐश्वर्या भद्रे आदी उपस्थित होते.

सुबोध  हरितवाल म्हणाले, “देशातील प्रश्नांवर आवाज उठवू शकणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१९ मध्ये ‘यंग इंडिया के बोल’ हे व्यासपीठ सुरु झाले. त्यामाध्यमातून देशातल्या युवकांना राजकीय मंच तयार करून दिला जातो. काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधी हे सतत युवकांना राजकारणामध्ये संधी देण्यासाठी आग्रही असतात. ‘यंग इंडिया के बोल’च्या माध्यमातून देशातील हजारो युवकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकतांत्रिक मुद्द्यांचे रक्षण तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी उपयुक्त ठरेल. मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावापर्यंतच्या सर्व युवकांना ‘यंग इंडिया के बोल’च्या माध्यमातून राजकारणामध्ये येण्याची संधी मिळेल.

‘यंग इंडिया के बोल’ ही एक भाषण आणि वादविवाद स्पर्धा आहे, ज्यात सबंध देशातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील. आलेल्या अर्जाची छाननी करून जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाते ज्याच्यामध्ये वाक-कला, विचारधारा आणि राजकीय समज अशा मुद्द्यांवरती परीक्षण केले जाते. निवडक स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संबंधित राज्याच्या राजधानी येथे स्पर्धा आयोजित केली जाते भाषण, वादविवाद व क्रिएटिव्ह भाषण या श्रेणीमध्ये त्यांची निवड केली जाते. स्पर्धेची भाषेचे माध्यम हिंदी, इंग्लिश आणि सर्व प्रादेशिक व स्थानिक भाषा मध्ये असते त्यासाठी  स्पर्धक स्वतः आपली भाषा निवडू शकतात. ‘यंग इंडिया के बोल’ची अंतिम स्पर्धा दिल्ली येथे होईल. त्यामध्ये राज्यस्तरीय विजेते स्पर्धक भाग घेतात आणि भाषण वादविवाद व क्रिएटिव भाषण या श्रेणीमध्ये विजेता घोषित केला जातो, असे  हरितवाल यांनी नमूद केले.

निवड करणाऱ्या पॅनलमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ता, वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व शोधार्थी आदींचा समावेश असतो. विजेता स्पर्धकांना भारतीय युवक काँग्रेसमध्ये प्रवक्ता म्हणून नियुक्ती देण्यात येते. या नियुक्त जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय सुद्धा होतात. या युवकांनी जनसामान्यांचा आवाज बनत देशातील बेरोजगारी, महागाई असे विविध ज्वलंत प्रश्न मांडावेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत स्पर्धा होईल. देशाचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, काँग्रेस पक्षाचे योगदान आणि केंद्र सरकारचे अपयश यावर तरुणांनी जाहीरपणे बोलले पाहिजे हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. काँग्रेसचा इतिहास आणि केंद्र सरकारचे अपयश मांडण्यासाठी ही स्पर्धा होत आहे, असेही दीपक राठोड यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *