#पुणे हिट अँड रन प्रकरण :  ‘मृत तरुण-तरुणीने मद्यपान केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप

Sensational allegation of former Home Minister Anil Deshmukh
Sensational allegation of former Home Minister Anil Deshmukh

पुणे( प्रतिनिधी) – पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे मोटार चालवून अल्पवयीनाने दोघा अभियंत्याचा जीव घेतल्याचे घटना नुकतीच घडली होती. दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूण-तरूणीने मद्यपान केल्याचे दाखविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांच्या मद्यमान चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह दाखविण्यात येतील, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर केला आहे. त्यामुळे पुण्यातील हिट अ‍ॅड रन प्रकरणाला आणखीच वळण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचा रक्तचाचणी अहवाल   निगेटीव्ह येण्यासाठी त्याचे रक्तनमुनेच बदल्याची धक्कादायक घटना ससूनमध्ये घडली होती. त्यामुळे आता याप्रकरणात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा  आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. आधी अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदले आता मृतांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्येही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी एक्सवर भूमिका मांडली आहे. पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून तो दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.

अधिक वाचा  जर मोदीजींनी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार - चंद्रकांत पाटील

अल्कोहोल (मद्यपान) चाचणी पॉझिटीव्हसाठी तयारी झाली

अपघातातील मृतकांची अल्कहोल (मद्यपान) चाचणी पॉझिटीव्ही यावी, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण- तरुणी हे दारु प्यायले होते. त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. त्यामुळे आरोपी बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत. असेही  अनिल देशमुख यांनी एक्सवर स्पष्ट केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love