वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे- अमृता फडणवीस


पुणे— वाईन ही दारूच असून लहान मूले आणि महिला सुपर मार्केटमध्ये जात असतात. त्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवणे अयोग्य आहे. वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारने नुकताच राज्यभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. विविध क्षेत्रातून सरकारच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्या लोणावळा येथे माध्यमांशी बोलत होत्या.

अधिक वाचा  राज्य बुद्धिबळ सात वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे प्रथम

काल राज्यातील विविध भागात विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलन केले. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पण, महाविकास आघाडी सरकार मधील निम्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे? हे माहित नसते. मंत्रालयाच्या सर्वच विभागात नुसती धांदल सुरू आहे. राज्यभरातील विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते केवळ मूठभर लोकांसाठी झटत असल्याचा टोला अमृता फडणवीस यांनी यावेळी लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love