महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झाले आहे- हर्षवर्धन पाटील


पुणे–एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झाले आहे. अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मतदान केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे कलह दिसून आले आहेत. त्यातूनच हे सरकार पडणार असून त्यासाठी आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.   सरकारच्या प्रतिनिधींना बदल्या करण्यामध्येच रस असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

अधिक वाचा  #Disqualification of MLAs : 16 आमदारांचे अपात्रता प्रकरण : अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची गुप्त भेट : विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदे सरकार वाचणार?

दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे अनैसर्गिक सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांच्याविरोधात जनमत व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे निवडणूक महत्वाची आहे. पदवीधरचे तीन, शिक्षकचे दोन आणि धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज संस्था या सहा ठिकाणी भाजपचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love