देवाभाऊ आणि दादांना काल शांत झोप लागली असेल..


पुणे- गेल्या रविवारचा दिवस हा राज्यातील सत्तेच्या सारीपाटाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला.गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून काकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने आणि कुरघोडीने दबलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आठ शिलेदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  (Maharashtra Political Crisis)

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांच्या २३ नोव्हेंबर २०१९च्या शपथ विधीवरून देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. या शपथविधिबाबत शरद पवार यांना कल्पना होती, त्यांना सांगूनच या सर्व गोष्टी झाल्या होत्या असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी फडणवीस हे सभ्य राजकारणी आहेत असं वाटलं होतं पण, ते असत्याचा आधार घेत आहेत असा आरोप करत पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातून राष्ट्रपती उठल्याचे म्हटले होते. त्यानंतर शरद पवार यांनी बैठक झाल्याची कबुली दिली. परंतु, ती गुगली होती. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करु शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात, हे मला समोर आणायचे होते असे शरद पवार यांनी म्हटले. यामुळे नक्की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं याचा उलगडा काही केल्या होत नव्हता. त्यावरून नक्की कोणी कोणाची विकेट घेतली यावर मात्र चर्चा झडल्या होत्या. राजकारणात मुरब्बी असलेल्या आणि कधी, कुठे, काय बोलायचे यात माहिर असलेल्या शरद पवार यांनी हे वक्तव्य केल्याने पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले.

अधिक वाचा  कारागृह अधीक्षकाची इच्छा मरणाची मागणी : का केली मागणी?

याबाबत खरतर सर्व माहिती अजित दादांना होती. माध्यम प्रतिनिधींनी अनेकदा अजित दादांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला परंतु, मी यावर काहीच बोलणार नाही असे दादांचे उत्तर ठरलेले असायचे. कधी कधी तर अजितदादा यावरून चिडलेले सर्वांनी पाहिले आहे. या दोन नेत्यांच्या या वाकयुद्धामध्ये संशयाची सुई ही अजित दादांकडे जात होती. अजित दादा मनात असतानाही बोलू शकत नव्हते तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस 2019 ला राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापणेबाबत 5 बैठका झाल्या  असतानाही शरद पवार किती खोटे बोलतात यामुळे चिडलेले होते. परंतु, याबाबत वेळ आल्यावर सर्व गोष्टी समोर येतील असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. शेवटी काल त्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. फडणवीस यांनाही हे सर्व दादांकडूनच वदवून घ्यायचं होतं. कारण राष्ट्रवादीने (शरद पवार) यांनी बैठका घेऊनही शिवसेनेबरोबर (Shivsena) केलेली हातमिळवणी, त्यानंतर भाजपची सत्ता जाणे या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्तेसाठी शिवसेनेत फूट पाडल्याचेही आरोप झाले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार ‘सीबीआय’ला अपयशी ठरवत असतील, तर ते त्यांचेच अपयश - सनातन संस्था

या सर्व प्रकारांमुळे कारण नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सातत्याने नाहक बदनामीला सामोरे जावे लागत होते. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची तयारी शरद पवार यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केली असताना  त्यांच्यावरच कुरघोडी करायची आणि त्यांनी ती काहीही न बोलता बदनामी सहन करायची, पुन्हा कोणी विचारले की त्याला खोटे उत्तरे द्यायची याला देवेंद्र फडणवीस वैतागले असणारच. तसेच दादाही कारण नसताना होणाऱ्या बदनामीला आणि त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी विचारणा करण्यावरून, तसेच त्यांच्याबाबत या प्रकारावरून शरद पवार यांनी जाणीवपूर्वक संशय निर्माण होईल अशी केलेली वक्तव्य यामुळे त्यांचा राग आत धुमसत होता. अखेर त्याला त्यांनी आपल्या भाषणातून वाट करून दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित दादा यांच्या मनावरचं ओझं नक्कीच कमी झालं असणार. यामागचा खरं व्हिलन कोण? हे अजितदादांनी घडलेल्या सर्व घटनेसह सांगितल्याने काल देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) आणि दादा (अजित पवार)या दोघांनाही शांत झोपली लागली असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अधिक वाचा  संत तुकारामांचा ‘उंच नीच काही नेणे भगवंत' हाच घेऊन विचार आमचे सरकार काम करत आहे - पंतप्रधान मोदी

Maharashtra Political Crisis | Sharad Pawar | Ajit Pawar | Devendra Fadanvis |

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love