#मराठा आरक्षण: 8 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा


पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासुन प्रलंबित आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपआपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाला आहे. अशी माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, राज्याच मुंबईत अधिवेशन होत असून त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयावर चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून  महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणीची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल असे देखील त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  अहमदनगर ओळखले जाणार 'अहिल्यानगर' म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थी वर्गांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत.

प्रमुख नेत्यांनी चर्चा एकत्रित चर्चा करावी

राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे महत्वाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेते मंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागु शकते. अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love