मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी केला खून


पुणे—मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा दाबून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचं नाव आहे.

 अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. जब्बार आणि मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यातील वराळे येथील पत्राशेडमध्ये विनायक भिकाजी पानमंद यांचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी आढळला होता. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

अधिक वाचा  अन्.. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही; निवडून आलेल्या पतीला खांद्यावर घेत काढली गावभर मिरवणूक

पोलिसांनी दिएल्या माहितीनुसार विनायक पानमंद यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला असताना त्याने गपचूप दुसरा विवाह केला होता. याची महिती वडील विनायक यांना दोन वर्षांनी केल्यानंतर त्यांचे तेव्हापासून मुलासाबोत भांडणे होऊ लागली. मुलाने दुसरे लग्न केल्यापासून वड वाढल्याचे वडील विनायक यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी मुलाच्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला आणि वरील आरोपींना खुनाची सुपारी दिली. त्यासाठी त्यांनी यांना टप्याटप्याने १ लाख ३४ हजारा रुपये दिले. मात्र, महिलेचा खून करण्यास आरोपी घाबरले. त्यामुळे खून करण्यास विलंब होत होता. त्यामुळे रागावलेल्या विनायक पानमंद यांनी आरोपींकडून पैसे परत घेण्यासठी तगादा लावला. पैसे परत मागत असल्याने आरोपींनी विनायक यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love