पोलीस शिपाई महिलेने तरुणाचे अपहरण करून मागितली किडनीची खंडणी

क्राईम
Spread the love

पुणे- पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.


या तरुणाला इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तरुणाचे आणि पोलीस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मोबाईल फोडून टाकला. त्यात भरीस भर म्हणजे आरोपींनी तरुणाला चक्क दहा लाख रुपये अथवा किडनीची खंडणी मागितली. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला.महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे, पोलीस शिपाई विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, आक्की लोंढे, सनी लोंढे, विनय लोंढे, मनीषा साळवेची आई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सूरज असगर चौधरी (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी,पुणे) असे अपहरण, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत शुक्रवारी (दि.११) मध्यरात्री वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर आरोपी विजय साळवे हा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे. आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. मनीषा हिने सूरजकडून काही पैसे घेतले होते.ते पैसे देण्यासाठी आरोपीने सूरजला ५ डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले. सूरज ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सूरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले.
तिथे आरोपींनी सूरजला लाकडी दांडक्याने, कोयत्याने मारहाण केली. दरम्यान आरोपींनी सूरजचा मोबाईल फोन घेतला. मनीषा हिने सूरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सूरजचा मोबाईल फोन फोडून फेकून दिला.त्यानंतर आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे नाहीतर तुझी किडनी दे, अशी मागणी करीत धमकी दिली. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा ते दुपारी तीन या कालावधीत घडला. याबाबत आठवडाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *