संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार- भारतीय मजदूर संघ


पुणे – आयुध निर्माण देहुरोड ( ordinaans factory Dahur road ) आस्थापनेतील  कंत्राटी कामगारांनी नुकतीच “ठेकेदार कामगार संघ” (संलग्न भारतीय मजदूर संघ ) च्या संघटनेचे नामफलकाचे  उद्घाटन संपन्न झाले. देहूरोड मध्ये सध्या ठेकेदारांनकडून कामगारांची जी पिळवणूक सुरू आहेत ते प्रकार थांबवावेत अन्यथा केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाऊ आणि वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु, असा इशारा यावेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी देहूरोड छावनी बोर्डचे प्रशासन श्री. कैलास पानसरे भा. म संघाचे  राष्ट्रीय  ऊद्योग प्रभारी श्री. अण्णा धुमाळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे , अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद , भा. म. संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण भा. म. संघ ,राष्ट्रीय  मिडिया प्रभारी श्री.निलेश खेडेकर भा.म. संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील  तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते श्री. अशोक थोरात यांनी सुत्रसंचालन केले मान्यवरचे स्वागत आस्थापनेतील  ठेकेदार कामगारांच्या वतीने करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढ वुन आणि रिबीन कापून नोटीस बोर्डाचे उद्धाटन करण्यात आले.

अधिक वाचा  वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत : राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांनी संघटित व्हायला हवे

संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रस्तावना सादर केली या वेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने  आंदोलनेच्या बरोबर ऊभे रहावे,  देशातील विविध राज्यात  चालू असलेल्या कंत्राटी कामगार महासंघाचे आंदोलने,  विविध योजनांची माहिती दिली व येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले. संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना भारतीय मजदूर संघ वाचा फोडेल असेही त्यांनी सांगितले. .

अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कंत्राटी कामगारांच्या सोबत ऊभे राहील असे नमुद केले आहे. 

आण्णा धुमाळ यांनी असंघटित कामगारांसाठी भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांची माहिती दिली तसेच देहूरोड मध्ये सध्या ठेकेदारांनकडून जी पिळवणूक सुरू आहेत ते प्रकार थांबवावेत अन्यथा केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाऊ आणि वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु, असा इशारा दिला. राजकीय पक्षाने ट्रेड युनियनच्या नावाने सुरू केलेले दुकान लवकर बंद करावे. कामगारांना हक्क मिळवण्यासाठी ते हे करत असतील तर त्यासाठीआम्ही त्यांना मदत करू पण जर राजकीय पक्ष म्हणून आपण कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारतीय मजदूर संघ सहन करणार नाही असा इशाराही धुमाळ यांनी  दिला.

अधिक वाचा  आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येणे गरजेचे - रामदास काकडे 

ठेकेदार कामगार संघाचे गणेश भेगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.  बाबूअण्णा यांनी सर्वाना मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या देहूरोड मधील इतर सर्व संघटनेच्या पदाधिकारी आणि जवळपास 200 ते 250 ठेकेदार कामगार यावेळी  उपस्थित होते .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love