Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षेचा पेपर फुटला?

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

बार्टी(Barti), सारथी(Sarathi), महाज्योती(Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप)(Fellowship) आयोजित करण्यात आलेल्या चाचणी परीक्षेदरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्याचे आढळून आल्याने संभ्रम निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाला.

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे (Set Department of Savitribai Phule Pune University)  देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात घेतलेल्या परीक्षेत २०१९ च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली गेली म्हणून ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्यानंतर आज (दि. १०) रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

सेट विभागाने प्रश्नपत्रिका छापायचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले होते. या संस्थेने ए आणि बी प्रश्नसंच छापून त्याला सील बंद करून दिले. परंतु, सी आणि डी हा प्रश्नसंच त्याने छपाई करून दिला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला सी आणि डी प्रश्नसंच स्वत: छापून घ्यावे लागले. छापलेल्या प्रश्नपत्रिका सील लावण्याची व्यवस्था विद्यापीठाकडे नसल्याने सी आणि डी हा प्रश्नसंच सील न लावता परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आले. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पूर्ण कल्पना होती.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी एखादी प्रश्नपत्रिका किंवा त्यातील काही प्रश्न परीक्षा केंद्राबाहेरील विद्यार्थ्यांना मिळाले तर पेपर फुटला, असे गृहीत धरले जाते. मात्र, तशा प्रकारचे पुरावे अद्याप प्राप्त झाले नाहीत. काही विद्यार्थ्यांना सीलबंद प्रश्नपत्रिका तर काही विद्यार्थ्यांना सील नसलेली प्रश्नपत्रिका का दिली गेली, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या परीक्षेत एकदा नाही तर दोनदा गोंधळ झाला आहे. दरम्यान, या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालयावर धडक मोर्चा काढत सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली.

——————–

पेपर फुटला नाही

फेलोशिप परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. या प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करून घेण्यात आली होती. त्यामुळे छपाई करण्याच्या स्वरूपामध्ये बदल असू शकतो. या प्रश्नपत्रिका संचांची अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करून छपाई करण्यात आली होती. आणि ते संबंधित परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरूपात पोहोचविण्यात आले होते. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया देखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे पेपर फुटीबाबत केलेले आरोप पुर्णत: निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

….बाळासाहेब कापडणीस, समन्वयक, सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *