पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाचे आयोजन

The India International Electric Vehicle Exhibition will be organized at the Auto Cluster in Pimpri-Chinchwad
The India International Electric Vehicle Exhibition will be organized at the Auto Cluster in Pimpri-Chinchwad

पुणे- वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये पिंपरी—चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ७००० हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक यामध्ये सहभागी होणार आहेत तर  ३००० हून अधिक उत्पादने आणि सेवांची यावेळी प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.  तसेच तसेच ३० हून अधिक नवीन उत्पादनांचे यावेळी प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती प्रदर्शनीच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. (The India International Electric Vehicle Exhibition will be organized at the Auto Cluster in Pimpri-Chinchwad)

अधिक वाचा  Ayodhya's first court case : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- १३ : ..... अखेर शुक्रवारचा देखील नमाज बंद झाला

चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला ग्लोबटेक मीडियाचे संचालक सतीश मंडोळे, फ्युचरेक्सचे मार्केटिंग व्यवस्थापक सतीश कुमार, प्रोजेक्ट हेड मुकेश यादव, टेक फोरमचे विलास रबडे आणि हेमंत पाध्ये उपस्थित होते. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने ही आजच्या काळाची गरज आहेत. भविष्यात मानवाला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त प्रचार झाल्याशिवाय गत्यंतर नाही.

या वेळी उपस्थित आयोजक पदाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल सविस्तर बोलताना सांगितले की, इलेक्ट्रिकल वाहन निर्मिती मध्ये बॅटरी टेक्नॉलॉजी महत्वाची असून. बॅटरी व्यवस्थापन प्रणाली या तंत्रण्यांचा वापर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बॅटरी व्यवस्थापन प्रणाली च्या १३ तज्ज्ञांची समिती येणार असून विविध विषयांवर ते चर्चा करणार आहेत.

अधिक वाचा  ॲड. प्रणिता देशपांडे यांची विश्व दलीत परिषदेच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर पदी नियुक्ती.

चाकण औद्योगिक क्षेत्र कमालीची प्रगती करत असल्यामुळे. या प्रदर्शनाला त्याचा खूप फायदा होणार असल्याचे विलास रबडे  म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षणात बदल करून येणाऱ्या पिढीला टेक्नॉलॉजी विषय जास्त माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे २.८ दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून ही बाजारपेठ अधिक वाढीसाठी सज्ज झाली आहे. असेही त्यांनी सांगितले.

फ्युचर्स ग्रुप इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनी चे संचालक नमित गुप्ता यांनी सांगितले की, वर्ष २०३० पर्यंत ९४.४ टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे निदर्शनात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.

अधिक वाचा  नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावरील परिणामकारक उपचार शक्य

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२२ मध्ये ८,६६८ वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे.

इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे ‘आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. ‘आयआयईव्ही’मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love