भारतास जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या, कपील देव – महेंद्रसिंह धोनींना अंतिम ‘विश्वचषक स्पर्धे’ पासुन दुर ठेवणे खेदजनक- गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे- अहमदाबाद (गुजरात) मधील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम’चे नामकरण झालेल्या “नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये”, नुकत्याच झालेल्या ‘भारत विरुध्द ॲास्ट्रेलीया वर्ल्ड कप क्रिकेट’च्या सामन्यास’, भारतीय क्रीकेटला जगात सर्वोच्च स्थानी नेणाऱ्या ‘भारतीय संघाचे माजी कप्तान कपील देव, महेंद्रसिंग धोनी इ.सह जगज्जेतेपद मिळवणाऱ्या ‘भारताच्या गौरवशाली क्रीकेटपटुंना निमंत्रित न करणे’ हा एकप्रकारे त्यांचा अवमान असुन, भारताचा जागतिक लौकीक वाढवणाऱ्या क्रिकेटपटुं विषयी कृतघ्नता व्यक्त करण्याजोगा निंदनीय प्रकार आहे. भारतीय क्रीकेट मध्ये अनावश्यक हस्तक्षेप मोदी सरकार करत असल्याचा हा पुरावाच असुन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या निंदनीय कृतीचा निषेध करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. दरम्यान, वर्ल्डकप स्पर्धेतील उपविजेत्या व विजेत्या ‘भारतिय व ॲास्ट्रेलीयन संघांचे देखील अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे काळाची गरज - गोपाळदादा तिवारी

भारतीय क्रीकेटच्या गौरवशाली, अनुभवी व जुन्या जाणत्या खेळाडुंना निमंत्रीत करणे हे भारतीय संघातील खेळाडुंसमोर प्रेरणादायी ठरत असते. ‘सांगेन गोष्टी ४ युक्तीच्या’ म्हणी प्रमाणे कदाचित या जेष्ठ व जगजेत्या खेळाडूंकडुन भारतीय संघास काही मार्गदर्शन ही झाले असते.परंतु श्रेयजीवी पंतप्रधान मोदींना अंतिम सामन्याचे श्रेय ‘इतर कोणाच्याही उपस्थितीच्या प्रभावामुळे’ विचलीत होऊ द्यायचे नव्हते काय?  असा उपहासात्मक सवाल गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.  

 १९८३ चा वर्ल्डकप जेता कपील देव तसेच २००७ (T-२०) व २०११ वर्ल्डकप जेता, महेंद्रसिंह धोनी यांनी कदाचित ‘भाजप प्रचार कार्यात’ भाग न घेतल्यामुळे भाजप नेतृत्वास आकस आहे काय (?) असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

जगजेता कप्तान कपील देव यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलन व महीला कुस्तीगीरपटुंच्या आंदोलनाबाबत एक खेळाडु नात्याने संवेदना प्रकट केल्या असल्या कारणानेच भारतास जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या महान खेळाडूस बीसीसीआयने निमंत्रीत केले नाही हे स्पष्ट होते, असा आरोपही गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love