A young man's life was taken for only 500 rupees

केवळ ५०० रूपयांसाठी घेतला तरूणाचा जीव

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ऐन दिवाळीचा उत्सव सुरू असतानाच सराईत आरोपीने केवळ ५०० रूपयांसाठी एका तरूणाचा जीव घेतल्याची घटना खराडीत घडली आहे. संबंधित तरूणाने सराईताच्या खिशातून गुपचूपरित्या ५०० रूपये काढून घेतले होते. त्याच रागातून सराईत आरोपीने तरूणाच्या डोक्यात, हातावर, नाकावर बांबूने मारहाण करून खून केला आहे. ही घटना ८ ते ९ नोव्हेंबर कालावधीत घडली त्यानंतर पोलीस तपासात खुनाचे कारण उघडकीस आल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. (A young man’s life was taken for only 500 rupees)

लोकेश रवींद्र पाटील (वय २२, रा. केसनंद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. किरण अशोक साठे (वय २४ रा. खराडी ) असे खून केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि लोकेश ८ नोव्हेंबरला खराडीत होते. त्यावेळी किरणने लोकेशच्या खिशातून ५०० रूपये गुपचूपरित्या काढून घेतले होते. त्याच रागातून सराईत लोकेशने किरणच्या डोक्यात बांबूने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. उपचारादरम्यान किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *