मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी टोकन रक्कम मदत म्हणून जाहीर करावी -चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे- मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात इतरांसारखा प्रवास करून उपयोग होणार नाही. त्या प्रवासामध्ये त्यांनी काहीतरी ठोस घोषणा करायला हवी. तसं न करता मुख्यमंत्री अजूनही अतिवृष्टी होऊ शकते, मी जरा पाहतो असे आश्वासन देत आहेत. पण, आता जे झालं त्याचाबद्दल बोला ना, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री महणून त्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी टोकन रक्कम मदत म्हणून जाहीर करायला पाहिजे असेही ते म्हणाले.

पुण्यामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. आणि ते पुन्हा आले. आज ते उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. परंतु, असा धावता प्रवास करून काही उपयोग होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रवास सुद्धा सलग करायला पाहिजे. खूप ठीकाणी गेले पाहिजे, खूप लोकांना भेटले पाहिजे. ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री परिस्थिती पाहून काय वाटतं ते जागेवर जाहीर करता आले पाहिजे आणि प्रसानाकडून त्याची अंमलबजावणी करून घेता आली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

कोणालाही कोंडीत पकडण्याचा विषय नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामती भागातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला तो तो तेथील शेतकरी जो उध्स्वस्त झाला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी व दु:ख समजवून घेण्यासाठी आहे. तसेच सरकारी दरबारी विरोधीपक्ष महणून मागणी करण्यासाठी आहे. बिहार निवडणुकीचे ते पक्षाचे प्रमुख आहेत. पंतप्रधान मोदींची परवानगी घेऊन ते ८५० कि.मी. प्रवास करून आले आहेत. त्यामुळे त्यांचा बारामतीचा अतिवृष्टी पाहणीचा दौरा हा हा कोणाला कोंडीत पकडण्याचा विषय नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवू देण्याचा विषय आहे असे त्यांनी सांगितले.

पवारांना वारंवार मुख्यमंत्र्याची भलावण करावी लागणे हे बरोबर नाही

जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात नेहेमी आदर असतो. मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री असताना कितीतरी गोष्टींना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. अशा व्यक्तिमत्वाला वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते, त्यांना प्रोटेक्ट करावे लागते, हे काही बरोबर नाही.    ‘मी या वयात बाहर पडतो, तू पड़ की रे बाहेर’ असे पवार मनामध्ये म्हणत असतील. परंतु, एकत्र सरकार  चालवायचे असल्याने  त्यांना मुख्यमंत्र्यांना प्रोटेक्ट करावे लागते असी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्न केंद्राने सोडवावा, कोरोनाच्या परिस्थिबाबत केंद्राने मदत करावी अशी मागणी काही झाले  की  केली जाते. खरतर अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ,निसर्ग वादळ झाले तर राज्य सरकारने मदत जाहीर करून टी द्यायला सुरुवात करायची असते. त्यानंतर, नुकसानीचा अंदाज घेऊन केंद्राकडे निवेदन पाठवायचे असते. ते निवेदन बघून केंद्र सरकार अनुदान देते. तुम्ही  लाख माघाल , परंतु ते नियमात बसावं लागतं.त्यामुळे आधी राज्य सरकारची तयारी असायला पाहिजे. केंद सरकारकडून जे मिळेल ते बोनस समजावं असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *