नाथाभाऊ कुठेही जाणार नाही-चंद्रकांत पाटील


पुणे – एखादी व्यक्ती नाराज होणे पुन्हा नॉर्मल होणे ही एक सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. एकदा नॉर्मल झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा नाराज होणार नाही असे कधीच  नसतं. त्यामुळे भाजपचे नेते एकनाथ आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरु आहे. त्यांची नाराजी दूर होईल आणि पुन्हा ते  आमच्या सर्वांचं नेतृत्व करतील असे सांगत नाथाभाऊ कुठेही जाणार नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपा नेते गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच येत्या २२ तारखेला ते त्यांच्या कन्येसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊ कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले.

अधिक वाचा  पीएमपीएमएल बससेवा सुरु करा - भाजपचे आंदोलन: गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाटील म्हणाले, नाथाभाऊ भाजपचे जेष्ठ नेते व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जे चर्चा करत आहेत, त्या सर्वांचा हिरमोड होईल. भाजपचे नुकसान होईल असे कुठलेही कृत्य ते  करणार नाहीत. परवा पक्षाच्या झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला ते दिवसभर ऑनलाईन हजर होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love