सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग


पुणे—कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’  लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील हडपसर भागातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन या कंपनीमध्ये सुरू असून येथूनच देशाच्या विविध भागात लसीचे वितरण सुरू आहे. अशा परिस्थितीत ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे.

हडपसर जवळील गोपाळ पट्टीतील असणाऱ्या सिरमच्या प्लान्टला ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

अधिक वाचा  कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत आहे.हिंदुस्थानमध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.त्यामुळे, कोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love