टेलिकॉम कंपन्या कोरोना काळातील नुकसान भरपाई करण्यासाठी वाढवणार टेरिफ दर


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे टेलिकॉम कंपन्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. परंतु त्याच्या नुकसानीची भरपाई या कंपन्या ग्राहकांच्या खिश्यातून करण्याच्या तयारीत आहेत. व्होडाफोन आयडीया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या आपले झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर या कंपन्यांच्या टेरिफ प्लानच्या किमती साधारण २ ते ५ टक्के महाग होण्याची शक्यता असून दर सहा महिन्यांनी १० टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत या कंपन्यांनी अजून अधिकृत विधान केलेलं नसलं तरी सीएनबीसीच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

डिसेंबर 2019 मध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना अचानक झटका देत आपल्या टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ केली होती. आता असाच झटका पुन्हा एकदा ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ प्लानमध्ये १०-४० टक्क्यांनी वाढ केली होती.आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया या कंपन्या पुन्हा आपल्या टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. सीएनबीसीच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

अधिक वाचा  Sidhu Moose Wala : आज भावाच्या खुनाचा बदला घेतला आहे.. ही तर सुरुवात आहे ..गॅंगवार भडकणार?

या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या टॅरिफ प्लॅन 2-5 टक्क्यांनी महाग होऊ शकतात, तर दर सहा महिन्यांनी दर १० टक्क्यांनी वाढू शकतात मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

दुसरीकडे एसबीआय कॅप्स विश्लेषक राजीव शर्मा यांनीही आपल्या एका अहवालात म्हटले आहे की लवकरच टेरिफ वाढीची शक्यता आहे. येत्या तिमाहीत हे दर वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जुलैच्या सुरुवातीस, इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया एंटरटेनमेंट अँड टेलिकम्युनिकेशन्सचे प्रशांत सिंघल यांनीही सांगितले होते की,  सध्याची परिस्थिती पाहता असे दिसते आहे की येत्या सहा महिन्यांत कंपन्या आपल्या रिचार्ज प्लानच्या किमतींमध्ये वाढ करू शकतात.

 प्रशांत सिंघल म्हणाले की, सध्या बहुतेक ग्राहक त्यांना परवडणारे रिचार्ज प्लान वापरत आहेत. अशा परिस्थितीत रिचार्ज प्लानची किंमत वाढवणे शहाणपणाचे नाही, परंतु दूरसंचार कंपन्या कोरोनाच्या संकटाने  त्रस्त आहेत,  त्यामुळे असे दिसते आहे की येत्या १२  ते १८  महिन्यांत टेरिफ प्लानच्या किमतीत दोनदा वाढ होऊ शकते.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love