पीएमपीएमएल बससेवा लवकरच सुरु होणार:पुणेकरांना दिलासा


पुणे—गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल बससेवा लवकरच सुरु होणार आहे. लॉकडाऊनने त्रस्त झालेल्या पुणेकर नागरिकांना त्यामुळे आणखी एक दिलासा मिळाला आहे. पीएमपीएल प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गणेश चतुर्थीपासून (२२ ऑगस्ट) पुन्हा एकदा पीएमपीएलच्या बस रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे . अनलॉक नंतर अनेक नियमांना शिथिलता दिल्यानंतर या दोन्ही शहरांमधील दुकाने, व्यापार, दैनदिन जीवन काहीसे पूर्वपदावर येत आहे. कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नाही परंतु, अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याने कोरोना बरोबर जगावे लागेल ही मानसिकता आता तयार होत आहे. थांबून चालणार नाही ही भावना सर्वांचीच आहे. अर्थात, हे करताना कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व खबरदारी घ्यावी लागणारच आहे.

अधिक वाचा  कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

गेल्या पाच महिन्यापासून बंद असल्यामुळे पीएमपीएललाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पीएमपीएलला प्रतिदिन दीडकोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, लॉकडाऊनच्या काळात पीएमपीएलचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.  कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च या सर्व गोष्टी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पीएमपीएल प्रशासनाने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्याला पवार यांनी तत्वत: मान्यता दिल्याने गणेश चतुर्थीपासून (२२ ऑगस्ट) या दोन शहरातील बससेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात साधारण ४०० ते ४५० बसेस रस्त्यावर धावतील. या बसेस कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरच सुरु होण्याची शक्यता आहे. नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात बससेवा सुरु करण्यात येईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love