उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -नॅनो बायोटेक्नॉलॉजी हे एक अत्यंत उपयुक्त क्षेत्र आहे, याचे संभाव्य दूरगामी परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये होतात. उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर म्हणून उद्यास येईल, अशी भावना एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्सेस आणि रिसर्च तर्फे  “बायोइंजिनिअरिंग मधील अलिकडील ट्रेंड” या विषयावरील पाचव्या  आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्व वक्त्यांनी व्यक्त केली.

बायोटेक्नॉलॉजीचा आरोग्यसेवा आणि पर्यावरणासाठी उपायोग या विषयावर ही परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, महात्मा गांधी विद्यापीठ, केरळचे कुलगुरू प्रा. साबू थॉमस, माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युशनचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक प्रो. विनायक घैसास यांच्या हस्ते झाले. एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्चच्या प्रमुख डॉ. रेणू व्यास यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.या परिषदेने तरुण विद्यार्थ्यांना आणि इच्छुक संशोधकांना जैव अभियांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक दिग्गजांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

उद्घाटनपर भाषण प्रमुख पाहुणे, प्रा. साबू थॉमस, कुलगुरू, महात्मा गांधी विद्यापीठ, केरळ यांनी केले. इतर प्रख्यात वक्त्यांमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन, आयर्लंडचे प्रो. जेरेमी सिम्पसन, हार्वर्ड मेडिकल स्कूल, एमए, यूएसए डॉ. नताली आर्टझी, डिजिटल लाईफ सायन्स बर्लिनचे संचालक डॉ. अँड्रियास बेंडर यांचा समावेश होता.

न्यूरोलॉजी, बायोइंजिनियरिंग आणि थेरप्यूटिक सायन्सेस कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को, यूएसए चे प्रा. रझा अब्बासी-असल, एनडीयु सिंगापूरचे प्रा. डॉ. जस्टिन डौवेल्स आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल एमए, यूएसएचे संशोधन शास्त्रज्ञ डॉ. नॅथन जॉन्सन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बायोइंजिनीयरींग आणि नॅनो तंत्रज्ञानाचे भविष्य याविषयावर मार्गदर्शन केले. परिषदेला सीरम इन्स्टिट्यूटचे डॉ. एस. के. जना, डीआयएटी डीआरडीओच्या प्रा. संगीता काळे, रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातचे डॉ. संदीप गौडाना, एमआयटी हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हार्वर्ड, यूएसएचे डॉ. शिलादित्य सेनगुप्ता आणि निरामाई आरोग्य विश्लेषण, बेंगळुरूच्या सीईओ गीता मंजुनाथ यांनी नॅनो-बायोटेक्नॉलॉजी आरोग्यसेवा आणि पर्यावरणासाठी उपाय या विषयांवर आपली प्रमुख भूमिका स्पष्ट केली.

या परिषदेत भारत आणि परदेशातील 78 विविध संस्थांकडून शंभरहून अधिक प्रस्ताव नोंदणी झाली होती. यातील काही निवडक प्रस्तावांची बायोइंजिनियरिंग आणि बायोटेक्नॉलॉजीमधील फ्रंटियर्सच्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित केले जातील.

दरम्यान, युवा संशोधकांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांकडून मूल्यमापन करण्यात आले आणि त्यांच्या पोस्टर आणि मौखिक सादरीकरणासाठी त्यांना बक्षिसे देण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *