माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे-निवृत्त केंद्रीय गृहसचिव (Retired Union Home Secretary) माधव गोडबोले (madhav godbole) यांचे पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. निर्भिड प्रशासकीय अधिकारी आणि प्रख्यात लेखक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे सन १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. केंद्र सरकारचे गृहसचिव असताना १९९३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. सन 1992 मध्ये बाबरी मशीद पतनाच्या वेळी केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत होते.

माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठीही गोडबोले यांचे लेखन मार्गदर्शक ठरले आहे.

डॉ. गोडबोले यांनी निवृत्ती घेतल्यानंतरही जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र  सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदी पाडण्याची घटना होत असताना ते केंद्रीय गृहसचिव होते.

डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. आणि पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशाच्या समकालीन राजकीय इतिहासाला वळण देणाऱ्या बाबरी मशीद पतनाच्या वेळी गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत होते.

तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तसेच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसेच त्याअगोदर डॉ. गोडबोले यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही काम केले होते.

डॉ. माधव गोडबोले यांनी प्रशासनासह अनेक पुस्तकेही लिहिली होती. माधव गोडबोले यांनी २२ पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाला आहे. ‘अपुरा डाव’ या नावाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित झाले आहे. माधव गोडबोले यांच्या मराठीतील पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *