‘#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर  


पुणे-  टाटा मोटर्स हा भारताचा अग्रगण्य वाहन निर्माता असून त्यांनी आज आरडीई आणि ई20 अनुकूल इंजिनसह बीएस6 फेज II श्रेणीची प्रवासी वाहने सादर केली. आपल्या अनुपालनापलीकडे जात टाटा मोटर्सने नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन पोर्टफोलिओत ताजेपणा आणला. ज्यामुळे सुरक्षा, वहन, आराम आणि सुलभतेत वृद्धी होणार आहे.

 या पोर्टफोलिओसह, कंपनीने श्रेणींमध्ये स्टँडर्ड वॉरंटी 2 वर्षे / 75,000 किमी ते 3 वर्षे / 1 लाख किमी दाखल केले, ज्याद्वारे गुंतागुंत-मुक्त मालकीचा अनुभव घेता येईल. कंपनीच्या वतीने, भारताच्या 1 ल्या क्रमांकाच्या एसयूव्ही – नेक्सॉन ही अतिशय आधुनिक आवृत्ती, कंपनीची महत्त्वपूर्ण एसयूव्ही – हॅरीयर आणि मुख्य एसयूव्ही – सफारी अशा एसयूव्हीं’च्या RED #DARK नवीन श्रेणीच्या आगमनाची घोषणा केली.

सुधारीत स्वरूपाच्या टिआगो, टिगोर, अल्ट्रोझ, पंच आणि नेक्सॉन

सुधारीत कामगिरी

Altroz आणि Punch ची लो-एंड ड्रायव्हेबिलिटी अशाप्रकारे वर्धित करण्यात आली आहे की लोअर गिअर्समध्ये अधिक आरामदायक अनुभव मिळतो. डिझेल इंजिनांवरील विश्वासाला दृढ होण्यासाठी आणि ग्राहकांना बहुविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, कंपनीने अल्ट्रोझ आणि नेक्सॉन या दोन्हींसाठी रेव्होटोर्क डिझेल इंजिन अपग्रेड केले आहेत. याव्यतिरिक्त, नेक्सॉन डिझेल इंजिन चांगल्या कामगिरीच्या दृष्टीने पुन्हा ट्यून केले गेले आहे.

अधिक वाचा  पुण्यातील सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या अपेक्षांनुसार, नवीन श्रेणी अधिक प्रसन्न इन-केबिन अनुभवाचा अभिमान बाळगते. या केबिनमध्ये लोअर एनव्हीएच आणि ड्रायव्हिंग अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायक डिझाईनकरिता नवीन वैशिष्ट्यांसह उन्नत करण्यात आली आहे.

 वाढीव मन:शांती

आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि ग्राहकांना आरामशीर मालकी अनुभव प्रदान करण्यावरील विश्वासाचे प्रतिबिंब म्हणून, टाटा मोटर्सने स्टँडर्ड वॉरंटी 2 वर्षे / 75000 किमी वरून 3 वर्षे / 1 लाख किमी ** पर्यंत वाढविली आहे.

शिवाय, नवीन आरडीई कंप्लायंट इंजिन अधिक प्रतिसाद देणारे आहे, त्याचप्रमाणे ते ग्राहकांना अधिक कार्यक्षमता प्रदान करण्याच्या दृष्टीने ट्यून करण्यात आले आहेत. संपूर्ण श्रेणीचे मायलेज 2.40 केएमपीएलपर्यंत वाढले आहे.

अल्ट्रोझ आणि पंच’ला आयडल स्टॉप स्टार्टचे मानक प्राप्त आहे, तर टियागो आणि टिगोरला टीपीएमएस मिळाले आहे, दोन्ही वैशिष्ट्यांमुळे सर्व मॉडेल्ससाठी रोड मायलेजच्या दृष्टीने अधिक चांगली ठरतात.

हॅरीयर आणि सफरी’ची उन्नत वैशिष्ट्ये:

OMEGARC ची भावंडे, हॅरीयर आणि सफारी अधिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांसह दणकट बनली आहेत. त्यात आता अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) चा समावेश झाला आहे, ज्याचा उद्देश एक आत्मज्ञानी वहन तंत्रज्ञान (इंटयूटीव्ह ड्रायव्हिंग टेक्नोलॉजी)चा आहे. ज्याचा समावेश वाहन चालवताना कोणत्याही आश्चर्याचा सामना करण्यासाठी करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाने संभाव्य अपघातांचा प्रभाव कमी होतो आणि रस्ता सुरक्षा वाढते. सुरक्षेच्या वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे: ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ट्रॅफिक साइन वॉर्निंग, हाय बीम असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज अलर्ट, डोअर ओपन अलर्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि रिअर कोलिजन वॉर्निंग.

अधिक वाचा  अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

26.03 से.मी. हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 360° सराउंड व्ह्यू सिस्टीम, 6 भाषांमधील 200+ व्हॉईस कमांड, मेमरी आणि वेलकम फंक्शनसह 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि 17.78 सेमी डिजिटल टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे प्रगत वैशिष्ट्यांशिवाय, सफारी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक बॉस मोड आणि मूड लाइटिंगसह मॅजेस्टिक सनरूफसह 4 वे पॉवर्ड को-ड्रायव्हर सीट अशी अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत असल्याने आनंदात भरच पडते.

सादर आहे RED #DARK श्रेणी

हॅरीयर आणि सफारी RED #DARK सर्वार्थाने नवीन वैशिष्ट्यांसह उपलब्ध असून आज ADAS दाखल करण्यात आले. त्याशिवाय फेंडर्सवर  RED #DARK लोगोसह बोल्ड ओबेरॉन ब्लॅक एक्सटीरिअर, पियानो ब्लॅक ग्रील सोबत झिरकॉन रेड अॅक्सेंट, आर 18 चारकोल ब्लॅक अलॉयसह रेड कॅलिपर्स देण्यात आले आहेत. अंतर्गत सजावटीविषयी सांगायचे झाल्यास, त्यातही भर घालण्यात आली असून विशेष स्वरूपाची कारनेलियन रेड इंटेरीयर थीम कारनेलियन रेड लेदरेट सीटसह अधिक जिवंत वाटते, ज्यामध्ये डायमंड स्टाईल क्विल्टींग, दरवाज्याला पूर्णत्व देणारी चांगली पकड देणारी ग्रॅब हँडल आणि सेंट्रल कन्सोल, हेडरेस्टवर RED #DARK लोगो, स्टील ब्लॅक फ्रंट डॅशबोर्ड डिझाईन आणि स्टेरिंग व्हील, कन्सोल तसेच दरवाज्यावर पियानो ब्लॅक अॅक्सेंटची सोय आहे.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांना 27 हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा

नेक्सॉन RED #DARK फ्रंट ग्रीलमध्ये आकर्षक स्वरूपाचे झिरकॉन रेड इन्सर्ट, R16 ब्लॅकस्टोन अलॉय व्हीलसह लाल रंगात फेंडर्सवर RED #DARK लोगो यासारख्या मनोरंजक घटकांसह बोल्ड ओबेरॉन ब्लॅक बॉडी कलर दाखवतो. कारलेलियन रेड थीम, लेदरेट सीट्स, स्टील ब्लॅक फ्रंट डॅशबोर्ड डिझाईन आणि स्टीयरिंग व्हील, कन्सोल आणि दरवाजे यांच्यावरील लाल अॅक्सेंटसह अंतर्गत सजावटीचा रुबाब वाढवते. 

आकर्षक किंमतीवर लॉन्च करण्यात आलेला नवीन बीएस6 फेज II पोर्टफोलिओ RED #DARK श्रेणी वैशिष्ट्यासह सादर करण्यात आला असून आपल्या नजीकच्या अधिकृत टाटा मोटर्स विक्रेत्याकडून अनुभव घेण्यासाठी तसेच नोंदणीसाठी उपलब्ध असेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love