अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे  मराठी  ओटीटी प्लॅटफॉर्म  “अल्ट्रा झकास” 


पुणे – मनोरंजन विश्वातील अग्रगण्य ”अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट” तर्फे  गुडीपाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म  “अल्ट्रा झकास” लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांनाअप्रतिम दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवंनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ, अशी विशालआणिअप्रतिम कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गांव आले गोत्यात १५ लाख खात्यात’ आणि ‘रौद्र’च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे.

‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्म ची रचना मनोरंजन विश्वातील प्रगत तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन करण्यात आलीअसून तुम्ही तुमचे आवडते शो कधीही, कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइस द्वारे पाहू शकता. तसेच या प्लॅटफॉर्म द्वारे दर्शकांसाठी अखंड व अनुकूल इंटरफेस उपलब्ध करण्यासोबतच प्रेक्षकांना सहजतेने कंटेंट ब्राउझ करण्याची आणि पाहण्याची सुविधा प्रदान करते.

अधिक वाचा  रेस कोर्स मैदानावर मोदींची महाविजय संकल्प सभा : २ लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड   एंटरटेनमेंट चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, आमचे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास’ लॉंच करण्यास उत्सुक आहोत, जे आमच्या प्रेक्षकांना उच्च- गुणवत्तेचा मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. खरंतर अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही आमच्या दर्शकांना एक अनोखा आणि मंत्रमुग्ध करणारा अनुभव देखील देत आहोत जोत्यांना इतरत्र कुठेही मिळणार नाही.”

अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स आणि विविध शैलींमधील कंटेंटचा विस्तृत संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे.  हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्ही सहित सर्व प्रमुख उपकरणांवर उपलब्ध आहे.

‘अल्ट्रा झकास’ चे बिझनेस प्रमुख वेंकट गारापाटी, यांनी सांगितले, आमच्या टीम ने हा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत जे आमच्या वापरकर्त्यांना एक उल्लेखनीय अनुभव देऊन जाईल. याशिवाय “प्रेक्षकांच्या सुखकर अनुभवासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट लायब्ररी पासून ते यूजर इंटरफेस पर्यंत सर्व तपशीलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.”

अधिक वाचा  #Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

अल्ट्रा झकास’ हे आपल्या दर्शकांना दर्जेदार अखंडित मनोरंजक अनुभव देण्यासाठी बांधील आहोत. तसेच या प्लॅटफॉर्म मार्फत सुमारे २००० पक्ष अधिक तास कंटेंटआणि १०००  पेक्षा जास्त टायटल हया लायब्ररी मध्ये उपलब्ध असून प्रेक्षकांसाठी विविध धाटणीचे कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी प्रमुख प्रोडक्शन हाऊस सोबतही आम्ही भागीदारी केली आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर मराठी प्रेक्षकांसाठी विविध हॉलीवुड चित्रपट सुद्धा मराठी भाषेत डब्ब करून उपलब्ध केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आमच्या आगामी प्रकल्पांमध्ये प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शकांची वर्णीही लागणार आहे.

येथे तुम्हाला एका लॉगिन मध्ये ५ अकाउंट बनवण्याची मुभा असून त्या मध्ये प्रत्येका जवळ वॉच लिस्ट, पाहणे सुरू ठेवणे, डाउनलोड, स्मार्ट सर्च, शिफारस इ.  वैयक्तिक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे,  तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुमचा आवडता कंटेंट डाउनलोड करून, पसंतीच्या रिझोल्यूशन मध्ये पाहण्याचा आनंद मिळवू शकता. त्याचप्रमाणे स्टोरेज मॅनेज करण्याची सुविधा ही इथे आहे.

अधिक वाचा  ओमायक्रॉनचा पुण्यात शिरकाव: पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण आढळल्याने खळबळ

अल्ट्रा झकास ची सर्व वैशिष्ट्ये प्रचंड सवलतीच्या दरा मध्ये लॉन्च ऑफर मध्ये २९९ रुपये प्रतिवर्ष, म्हणजेच एक रुपयापेक्षा कमी प्रतिदिन सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून देत आहे. तसेच तीन महिन्यांसाठी हेच प्रीमिअर कंटेंट पाहायचे असल्यास १४९ रुपयांमध्ये प्लॅन उपलबध आहे. सदस्यत्व नसलेल्या दर्शकांना काही प्रीमियम कंटेन्ट विनामूल्य पाहण्याची मुभा आहे.

‘अल्ट्रा झकास’ अॅप आता प्ले स्टोअरआणिअॅप स्टोअर वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सदस्यत्व घेऊन,  दर्शक आमच्या विशाल लायब्ररी मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या कंटेंटची अनुभूती मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी, कृपया डब्लूडब्लूडब्लू डॉट अल्ट्राझकास डॉट कॉम  (www.ultrajhakaas.com) ला भेट द्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love