दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रुग्णालयाबद्दलही भीती निर्माण झाली आहे. रुग्णांकडून आपल्याला असणाऱ्या आजाराची नियमित तपासणीही अशावेळी टाळली जात आहे. पूर्वी जे रुग्ण सर्वसामान्य हृदयरोग तपासणी अथवा हृदय संबंधित आजाराने त्रस्त होते आता तेच रुग्ण हार्ट अटॅकमुळे (हृदयविकाराचा झटका) रुग्णालयात अत्यावस्थेत दाखल होत आहेत. हृदय रोगाच्या संभाव्य दुष्परिणामांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि बाळगलेल्या भीतीमुळे हृदयरोग रुग्णाचा मृत्यूदर वाढत आहे. कोरोना पेक्षा हृदयसंबंधित आजाराने रुग्ण दगावण्याचे प्रमाण २०-३०% झाले आहे. हृदयविकाराचा झटाक्या नंतर साधारण ६० मिनिटात रुग्णावर प्रार्थमिक अँजिओप्लास्टी (PAMI) झाली पाहिजे. हार्ट अटॅक नंतरचे हे ६० मिनिट रुग्णांसाठी सुवर्णक्षण (Golden Period) ठरू शकतात.
डॉ. सचिनकुमार पाटील यांनी दिल्येल्या माहितीनुसार, नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल विस्तीर्ण असून सर्व सोई सुविधांनी परिपूर्ण आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णाची प्रथम HRCT आणि कोरोना संबंधित चाचणी केली जाते, त्यानंतरच रुग्णावर प्रार्थमिक अँजिओग्राफी / अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला जातो. हृदयरोग रुग्णांना नियमित तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता निरोगी हृदयासाठी वेळेत तपासणी करावी. जे रुग्ण कोरोना बाधित होते त्यांच्यात रक्ताच्या गुठळ्या / गाठी (Blockages) होण्याची संभावना असते त्यामुळे सध्या हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. रुग्ण कोरोना बाधित असले किंवा नसले तरी त्यांच्या हृदयावर एकूणच परिस्थितीचा परिणाम होत आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले श्री. विनोद देसले (नावात बदल) कोरोना बाधित होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. परंतु श्वसना संबंधित काही लक्षणे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सगळ्या तपासण्या केल्यावर असे लक्षात आले कि रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्या रुग्णावर तज्ञांकडून अँजिओप्लास्टी करून रुग्णास योग्य उपचार दिले गेले. कोरोनाच्या भीतीने हृदय संबंधित आजारांकडे केलेल्या दुर्लक्षातून घडलेल्या प्रकारचे दुष्परिणाम अत्यंत वाईटही असू शकतात. कोरोना उपचार नंतरच्या (Post Covid) हृदय विकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. ज्या रुग्णांना हृदयरोग, श्वासा संबंधित विकार, मधुमेह आहे त्यांनी नियमित हृदयरोग तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
डॉ. सचिन कुमार पाटील
हृदयरोग तज्ञ,
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक