पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा उच्चांक: दिवसभरात नवीन ५७२० पॉझिटिव्ह रुग्ण तर ४४ जणांचा मृत्यू

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. आज (शनिवारी) नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. आज दिवसभरात नवीन ५७२० पाॅॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

पुणे शहरात आणि जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ ही आता पुणेकरांच्या दृष्टीने भयावह वाटायला लागली आहे. पुण्यातील वाढते कोरोनाचे संकट लक्षात घेवून शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पुण्यातील कोरोनाचे संकट आटोक्यात येईल असे वाटत असताना आजचा नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९ असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३९५१८ इतकी आहे.

आज दिवसभरात पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील ०९ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत  ५४११ एकूण मृत्यू झाले आहेत तर आजपर्यंतच एकूण २३८८९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण २००६६ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *