कोरोना काळात जिओची दमदार कामगिरी:बीएसएनएलने गमावले 50000 ग्राहक


मुंबई–कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे तर बीएसएनएलने 50000 ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर जिओ 3.27 कोटी ग्राहक, भारती एअरटेल 1.55 कोटी आणि बीएसएनएल 70 लाख ग्राहक आहेत.

सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक 7 लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर  भारती एअरटेलने 35 हजार  ग्राहकांची  वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाने तब्बल 6.5 लाख वापरकर्त्यांची नकारात्मक घट नोंदविली आहे. तर बी एस एन एल 50000 ग्राहक गमावले आहेत.

अधिक वाचा  'प्रॉपटायगर डॉट कॉम' तर्फे 'राईट टू होम' गृह प्रदर्शन

 जून 2020 मध्ये असलेल्या 9.33 कोटी सबस्कायबर्स मध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून 35,000 ग्राहकांनीही भर पडली असून जूनमध्ये स्बस्क्राइबर्स 9.12 कोटीवर पोहोचले आहेत. जून महिन्यात, केवळ जिओमध्ये  मे 2020 च्या तुलनेत 1 % पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सध्या, व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांचा सर्वाधिक वाटा 39.35% आहे आणि  35.87% शेअरसह जिओ दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर भारती एअरटेलचा वाटा सुमारे 17.09% आणि बीएसएनएलचा 7.69 टक्के आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love