महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय : संभाजीराजे नक्की काय करणार?

राजकारण
Spread the love

पुणे- राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढणार आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या शिवसेनेकडून निराशा पदरी पडली. त्यामुळे संभाजीराजे नक्की काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी आज सकाळी एक ट्वीट करून त्यांच्या भूमिकेबद्दल काहीसा सस्पेन्स निर्माण केला आहे.

आपली कटिबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि बांधिलकी जनतेशी आहे, असे संभाजीराजे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याचे शिवसेनेने नाकारल्यानंतर संभाजी राजे समर्थक संतप्त झाले. त्यांनी आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार असे बॅनर सोशल मीडियामध्ये व्हायरल केले.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विट करून आपल्या भूमिकेबाबत काहीशी स्पष्टता आणि काही सस्पेन्स तयार केला आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे. आपल्या विचारांची बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि जनतेशी आपली बांधिलकी आहे, असे ट्विट करून त्यांनी स्वतःला राजकीय पक्षांच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. मात्र त्याच वेळी आपली राज्यसभेचे अपक्ष उमेदवारी कायम राहणार की नाही??, उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही??, त्यासाठी मतांची बेगमी कशी करणार??, या प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही सस्पेन्स ठेवली आहेत.

शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ते आपल्या प्रचाराला सुरुवातही करतील. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. यानंतर संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका जाहीर करतील??, याविषयी उत्सुकता वाढणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *