सैनी घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुमना सन्याल यांची गायनाद्वारे स्वरांजली


पिंपरी(प्रतिनिधी): एखाद्याचे गायन स्वर थेट तुमच्या मनाला भिडतात अन् आत्म्याला आनंद देऊन जातात. अशाच निखळ संगीत आनंदाची अनुभूती नुकतीच पिंपरी-चिंचवडकर रसिकांना आली. निमित्त होते त्रिवेणी संगमच्या वतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रमाचे.

 त्रिवेणी संगमच्यावतीने दिवंगत पं. अमरेश चौधरी आणि दिवंगत पं. समरेश चौधरी या दोन महान संगीतकारांना गायनाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तानसेन यांच्या वंशजांची निर्मिती असलेल्या सैनी घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुमना सन्याल यांनी आपल्या गायनाद्वारे स्वरांजली वाहिली. या स्वरांजली कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. या स्वरांजली सभेचे आयोजन डॉ. सायबलकुमार संन्याल यांनी केले होते.

गायिका सुमना सन्याल यांच्या समृद्ध आणि खोल आवाजाने सत्राची बहारदार सुरुवात झाली. जादूची कांडी फिरवावी तशी त्यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतला. अन् रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग पूरिया कल्याण आणि राग अहिर भैरव या एक ताल व नंतर तीन ताल आणि तरणा मधील द्रुत सादर केले. त्यानंतर त्यांनी ‘दयानी भवानी…’ हे प्रसिद्ध भजन, ठुमरी आदी शास्त्रीय प्रकार सादर केले. तसेच सुरेश वाडकर यांचे माझ्या मना लागो छंद या गाण्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

अधिक वाचा  राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सायबलकुमार संन्याल यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love