मुख्यमंत्र्यांनी रघुनाथ कुचिक यांचा तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा -चित्रा वाघ


पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना केली. पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते. मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

 शिवसेना नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. कुचिक प्रकरणात त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिकर यांच्या जामीन अर्जावर हरकत घेत १५  एप्रिलला पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या संदर्भात त्यांना आज चौकशीसाठी पुणे पोलिांकडून बोलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अधिक वाचा  भारतरत्न असलेल्या लोकांना ट्विट करायला सांगणे हे बरोबर नाही - राज ठाकरे

पीडित तरुणी मुलीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते.  त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, पीडित तरुणीच्या पाठीशी मी कायम उभी राहणार, तिला जी मदत लागणार ती करणार. पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते, मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का ? ,बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांचा जामीन अर्ज रद्द व्हावा म्हणून मी आज माझा जबाब दिला आहे, माझी कधी गरज लागली तर यायला तयार आहे. असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

१२ एप्रिल रोजी माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. यानंतर पीडितेने केलेला खुलासा मी पोलिसांकडे दिला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मी मागणी केली होती की, ज्या अटी शर्तींवर रघुनाथ कुचिक यांना जामीन मिळाला आहे तो रद्द व्हावा. त्यांनी अटी शर्तींचा भंग केला आहे. पोलिसांनी त्याची चौकशी करुन जामीन रद्द होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्या अर्जावरील सविस्तर जबाब शिवाजीनगर पोलिसांनी घेतला आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. माझ्याकडे जे पुरावे होते ते मी पोलिसांना दिले आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द होईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

भाजपचे नेते गणेश नाईक यांनी एका मुलीवर बलात्कार केला आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, गणेश नाईक प्रकरणातील पीडित महिलेच्या पाठीशी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र नाईक दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

अहंकारातून कोण कुणाला रावण म्हणतो हे पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्यांनी त्याचा अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं”, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, विरोधकांच्या अंगात रावण संचारलाय त्यांनी त्याचा अंत करावा इति सर्वज्ञानी संजय राऊत. आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगात शकुनी मामा संचारलाय. त्याचा अंत महाराष्ट्राची जनताच करेल. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love