सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे वृत्त सुरजेवाला यांनी फेटाळले

राजकारण
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचे वृत्त पसरल्यानंतर रविवारी संध्यकाळी उशिरा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांनी  हंगामी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. उलटसुलट वृतांमुळे उद्याच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्याच्या होणाऱ्या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह 23 जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याची मागणी केली असल्याचे आणि  सोनिया गांधी यांनी या पत्राची दखल घेत या पत्राला उत्तर देताना  सर्वांनी मिळून पक्षासाठी एका प्रमुख शोधला पाहिजे. कारण आपल्याला आता ही जबाबदारी सांभाळण्याची इच्छा नाही. असेही वृत्त काही वाहिन्यांनी प्रसारित केले आहे.   

कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त खोटे आहेत.

 महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेसमधील अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांना एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी दर्शविली आहे. या दिशेने सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. तथापि, या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह 23 जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सोनिया गांधी यांनी या २३ जणांच्या पत्राची दाखल घेतली असून त्यावर भाष्यही केले आहे. सोनिया गांधी यांनी या २३ जणांनी लिहिलेल्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सर्वांनी मिळून पक्षासाठी एका प्रमुख शोधला पाहिजे. कारण आपल्याला आता ही जबाबदारी सांभाळण्याची इच्छा नाही. 

आपले नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर  पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की,  १० ऑगस्ट रोजी कॉंग्रेस कार्यकारी समितीने (सीडब्ल्यूसी) सोनिया गांधी यांना संघटनेचा कार्यभार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केल्यानंतर गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्यामध्ये रस नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान, २०१९  लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची नैतिकता स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षामध्ये पुढील अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. ज्यातील एक गट हा राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करणारा आहे. तर, दुसरा गट हा गांधी घराणे सोडून इतर अध्यक्ष करावा या विचारांचा आहे . 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *