पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही सांगत हात वर केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत भाष्य न करता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ढकलला आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनाच विचार असे त्यांनी म्हटल आहे.
खडसे घट स्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वारुळात जाही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादीकडून कोणीही अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही याबाबत पत्रकारांनी विचारले असतं त्यांनी खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्याकडे चेंडू टोलवला होता. त्यामुळे उद्या (शनिवारी) खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही
दरम्यान, पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. कोणीही यावं आणि मनमोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकासाठी रॅली काढली, त्याच भागात साखर कारखाना बंद आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढयाची वर्क ऑर्डर दोन दिवसात काढणार, लवकरच हा विषय मार्गी लागणार, असे आश्वासनही सुप्रिया सुळेंनी दिले.