खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश:बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात


मुंबई- घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, त्यांना विधान परिषदेतून आमदारकी देऊन कृषी खाते देणार अशा प्रकारची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सुत्रांकडूनही अशी माहिती मिळाली होती. मात्र, खडसेंचा राष्ट्रवादीतील  प्रवेश म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरला आहे.

खडसे यांना पक्षात डावलले जात असल्यामुळे त्यांनीच अनेकवेळा नाराजी व्यक्त केली होती. त्यांवह्या राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रवेशावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. घटस्थापनेचा मुहूर्त ठरला असताना आज त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश फुसका बार ठरला. काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती तर त्यांवह्या समर्थकांनीसुद्धा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी त्यांना आग्रह केलं होता. परंतु खडसे यांनी  ‘माझ्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत, मला राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत काही बोलायचे नाही’ असे सांगत त्यांच्या निर्णयाचे गुढ कायम ठेवले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अजित पवार म्हणतात...वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक