महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे—पुणे पोलिस दलातील महिला कर्मचारी  श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय 28) यांनी त्यांच्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

श्रध्दा जायभाये या विवाहीत आहेत. त्या पुण्यातील वाकड भागातील कावेरीनगर पोलीस लाईन येथे राहतात. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून सध्या ते केरळमध्ये आहेत. श्रध्दा यांना दोन वर्षांची मुलगी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रध्दा यांची मैत्रीण त्यांना फोन करत होती. मात्र श्रध्दा यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी श्रध्दा यांनी पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे आढळले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

अधिक वाचा  तर.. ज्येष्ठांविषयी उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू-अॅड. एस.के. जैन

श्रध्दा या पुणे शहर दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस होत्या. श्रध्दा यांचे पती नोकरीनिमित्त केरळला असून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांची मुलगी तिची आई श्रध्दा यांच्यासोबत वाकड येथे वास्तव्यास होती. श्रध्दा यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यानंतर श्रध्दा यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love