फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांची डोक्यात दगड घालून हत्या

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे— फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडल आहे. दरम्यान, या प्रकरणातील आठही आरोपी फरार झाले आहेत.

शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघेही पुणे जिल्ह्यात असलेल्या दौंड तालुक्यातील पाटस येथील रहिवाशी आहेत.

शुभम संतोष शितकल व गणेश माकर यांना आरोपी मन्या उर्फे महेश यांने मोबाईलवरून शिवीगाळ केली, तसेच वाद झाला होता त्याचा जाब विचारण्यासाठी शुभम आणि गणेश हे तामखडा येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांवर हल्ला केला. तलावरीने वार करीत डोक्यात दगड घालून दोघांची हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले.

 माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही मयत तरुणांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. मयतांच्या कुटुंब व नातेवाइकांचा मोठा जमाव जमविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पाश्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी अर्जुन माकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यातील तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *