डेक्कन क्वीनचा ९३ वा वाढदिवस केक कापून जल्लोषात साजरा


पुणे -मुंबईदरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनच्याराणीचा (डेक्कन क्वीन) आज ९३ वा वाढदिवस केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा , डेक्कन क्वीनचे प्रवासी, रेल्वे प्रशासन आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. त्याला आता ९२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली ‘लक्झरिअस सेवा’ म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, ‘पॅलेस ऑन व्हील्स’ यांसारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या ‘डायनिंग कार’चा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर इंटरसिटी गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.

अधिक वाचा  पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यवसायानिमित्त पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करतात. त्यांनी १९५४ मध्ये पहिल्यांदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी हर्षा शहा पाच वर्षांच्या होत्या. तेव्हापासून दर वर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. काकांच्या पश्चात त्यांनी स्वत: वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली. वाढदिवस साजरा करण्याचे हे ६८वे वर्षे आहे, अशी माहिती हर्षा शहा यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love