या आठवड्यात इंडियन आयडॉल सीझन 14 मधील टॉप 15 स्पर्धकांचा भव्य ‘गृह प्रवेश’

Top 15 contestants of Indian Idol season 14 enter grand 'home' this week
Top 15 contestants of Indian Idol season 14 enter grand 'home' this week

मुंबई- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे देशातील होतकरू गायकांना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी मिळालेला राष्ट्रीय मंच आहे. इंडियन आयडॉलच्या 14 व्या सीझनच्या अलीकडेच झालेल्या थिएटर फेरीत यंदाच्या सर्वोत्तम 15 स्पर्धकांची निवड झाली आहे. आता एक पाऊल पुढे जाऊन हे 15 स्पर्धक आपल्या गायन कौशल्याने मंच जिंकून घेण्यासाठी सरसावले आहेत. या आठवड्यातील ग्रँड प्रीमियर एपिसोड्सचे थीम ‘गृह प्रवेश’ असे आहे. ‘म्युझिक का सबसे बडा घराना’ असलेल्या या रियालिटी शोमध्ये परीक्षक कुमार सानू, श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी भारतातील सर्वश्रेष्ठ गायक शोधून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. होस्ट हुसैन कुवाजेरवाला आपल्या मोहकतेने आणि कुशल संचालनाने या शोच्या रंजकतेत भर घालेल.

अधिक वाचा  चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात? : महाराष्ट्र शासनाकडून मागवला सविस्तर अहवाल

 ग्रँड प्रीमियर आणखी भव्य बनवण्यासाठी सलीम-सुलेमान, हंसराज रघुवंशी, रिचा शर्मा, अभिजीत  सावंत यांसारखे संगीत आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार या भागात हजेरी लावणार आहेत. शिवाय त्याला ग्लॅमरची चमक देण्यासाठी आगामी डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा’ चा परीक्षक अर्शद वारसी सुद्धा श्रीराम चंद्रा आणि शोएब इब्राहीम या दोन स्पर्धकांना घेऊन येणार आहे.

 तब्बल 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी गायिका आणि या शोची परीक्षक श्रेया घोषाल ‘गृह प्रवेश’ विशेष भागाबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना म्हणते, “मी राष्ट्रीय पुरस्कार घरी घेऊन येते तेव्हा मला जसा आनंद होतो, तसाच आनंद मला इंडियन आयडॉल या ‘घराण्यात’ परतताना होत आहे. सर्व टॉप 15 स्पर्धकांचे मी अभिनंदन करते. आम्ही काही अद्भुत स्पर्धक निवडले आहेत आणि मी स्वतः देशभरात आणि देशाच्या बाहेर देखील त्यांचे कौतुक ऐकले आहे. आमच्यासकट सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धकांचे गाणे ऐकण्यास आतुर झाले आहेत. हा खूप मोठा दिवस आहे कारण आम्ही टॉप 15 स्पर्धकांचे इंडियन आयडॉल घराण्यात स्वागत करत आहोत. हा मंचच नाही तर संपूर्ण देश त्यांना ऐकण्यासाठी आसुसला आहे.

अधिक वाचा  राज्यपाल कोश्यारींनी स्वत:ला केले आयसोलेट, राजभवनातील १६ कर्मचार्यांना कोरोनाची लागण

कुमार सानू आणि विशाल दादलानी यांनी देखील श्रेयाच्या सुरात सूर मिळवून टॉप 15 स्पर्धकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 होस्ट हुसैन कुवाजेरवाला म्हणाला, “गृह प्रवेश एपिसोडने इंडियन आयडॉल सीझन 14 ची दणक्यात सुरुवात होत आहे. ऑडिशन फेरीपासून या ग्रँड प्रीमियर एपिसोडपर्यंत येतानाच सर्व टॉप 15 स्पर्धकांमध्ये खूप सुधारणा झालेली दिसत आहे. प्रेक्षकांना या वीकएंडला भरपूर मनोरंजन आणि सुमधुर संगीत अनुभवता येणार आहे. इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये ‘गृह प्रवेश’ एपिसोड या 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर असेल.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love