काँग्रेसच्या माजी नागरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे-काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत यांच्या पत्नी नीता परदेशी या गेल्या वेळी काँग्रेस पक्षाकडून पालिकेची निवडणूक लढवली होती. त्या नगरसेविका राहिल्या आहेत. त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन देखील होत्या. जयंत यांचे लॉ कॉलेज रस्त्यावरील कांचन गल्लीत ऑफिस आहे. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे. ते व्यवसायिक आहेत.

अधिक वाचा  तडीपार सराईत गुंडाचा दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने खून

दरम्यान बुधवारी मध्यरात्री त्यांनी ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मुलगा ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना वडील जयंत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही. पण नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love