चोरांचे सम्राट शरद पवार अशा घोषणा देत एसटी कर्मचार्यांचा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल


मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा s t workers सहा महिन्यापासून विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.  त्यासाठी आझाद मैदानावर गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे.  मात्र, आपल्या मागण्यांचा राज्यातील महाविकास आघाडी सरकार विचार करत नाही आणि आपली विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार sharad pawar यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर धडक देत दगडफेक व चप्पल फेक करीत हल्लाबोल केला.  विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घरात उपस्थित होत्या आंदोलनकर्त्यांनी .’चोरांचे सम्राट शरद पवार’ अशा घोषणा देत आमच्या वाईट अवस्थेला शरद पवारच जबाबदार आहेत असा आरोप केला.

अधिक वाचा  माइण्‍ड वॉर्सच्‍या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्‍मक प्रतिसाद

 आमचे हाल कोणी ऐकायला तयार नाही असा आक्रोश एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केला.  सुप्रिया सुळे यांनी या कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आई वडिलांची आणि माझ्या मुलीची सुरक्षितता महत्त्वाची आहे,  त्यांना बघून मी परत येते आपण चर्चा करू, असे  म्हणून त्या  आतमध्ये गेल्या.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन एका बसमधून पुन्हा आझाद मैदानावर नेले. या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत या आंदोलनाला आणि आजच्या या कृत्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे तसेच महाराष्ट्रातली परिस्थिती ज्यांना चिघळावयाची आहे तेच  या आंदोलनाला चिथावणी देत आहे असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे तर शरद पवारांनीच एसटी विलीनीकरणाच्याबाबतीत राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते मग तो शब्द त्यांनी का पाळला नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love