#Shriram Lagu Rang – Awkash: श्रीराम लागू रंग – अवकाशाच्या रूपाने प्रायोगिक रंगभूमीला मिळणार नवा आयाम

Sriram Lagu Rang – Awkash will give a new dimension to experimental theater
Sriram Lagu Rang – Awkash will give a new dimension to experimental theater

Shriram Lagu Rang – Awkash : प्रायोगिक रंगभूमीचे ( Experimental theatre) अवकाश आणखी विस्तारणाऱ्या आणि या  रंगभूमीला नवा आयाम देणाऱ्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाश (Shriram Lagu Rang – Awakash) या प्रकल्पाची उभारणी आता पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर (Maharashtra Culture Centre)  आणि लागू परिवार(Lagu Family)  यांच्या वतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून टिळक रस्त्यावरील(Tilak Road)  हिराबाग चौक(Hira baug Chowk) येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या (Jyotsna bhole Hall) इमारतीत पहिला मजला येथे हे रंग – अवकाश उभारण्यात आले आहे. या श्रीराम लागू रंग – अवकाशाचे औपचारिक उद्घाटन येत्या गुरुवार दि १८ जानेवारी रोजी, सायं ४ वाजता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ( Naseeruddin Shah ) यांच्या हस्ते होणार आहे. (Sriram Lagu Rang – Awkash will give a new dimension to experimental theater)

यासंदर्भातील अधिकृत माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे(Dr. Mohan Agashe) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, खजिनदार शुभांगी दामले, प्रकल्पाचे वास्तुविशारद माधव हुंडेकर, आरती मोरवेकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “मी आजवर जगभरात अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग केले आहेत. माझ्या या नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवानंतर या ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि रंगमंचीय व्यवस्थेत मिळणारी मोकळीक विशेष आहे असे मला वाटते. ही जागा पाहून मला मनस्वी आनंद झाला आहे, जगभर केलेल्या प्रयोगांनंतर मी हे अगदी ठामपणे सांगू शकतो. हे अवकाश पाहून मला हॉलंडमध्ये झालेल्या घाशीराम कोतवाल नाटकाच्या प्रयोगाची आठवण झाली. अशी जागा आज पुण्यात उभी होत असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. प्रायोगिक रंभूमीवरील अनौपचारिक शिक्षणात ही जागा भविष्यात मोलाचा वाटा उचलेल असा मला विश्वास आहे.”

अधिक वाचा  यंदाचा 'कलाश्री पुरस्कार' उस्ताद मश्कुर अली खाँ यांना, तर 'युवा पुरस्कार' बासरी वादक दीपक भानुसे यांना प्रदान

रंग – अवकाशाच्या संकल्पनेबद्दल बोलताना राजेश देशमुख म्हणाले, “आज काळ बदलत आहे, जग बदलत आहे, नाटकाची परिभाषा, प्रायोगिक रंगभूमी या सर्वच गोष्टी बदलत आहेत. हे होत असताना दिग्दर्शक व कलाकार नाटके सादर करताना रसिकांसमोर आपला विषय पोहोचविण्याचा, त्यांच्या अधिकाधिक जवळ येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यादरम्यान कलाकाराला केवळ एक स्टेज नाही तर अवकाशाची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर लागू कुटुंबियांच्या मदतीने ‘ब्लॅक बॉक्स’ या संकल्पनेवर आधारित श्रीराम लागू रंग – अवकाशाची निर्मिती सेंटरने केली आहे. विविध स्वरूपातील, पर्यायातील रंगमंचीय व्यवस्था उपलब्ध करून देत प्रायोगिक रंगभूमीला सर्जनशीलतेचा नवा आयाम देणारी अशी ही सुविधा असणार असून प्रेक्षकांनी कुठे बसायचे, कलाकाराने कुठे सादरीकरण करायचे हे येथील व्यवस्थेमध्ये ठरविण्याची मोकळीक आयोजकांना मिळणार आहे.”

कलाकार, दिग्दर्शकाला उच्च दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील. प्रोसेनियम थिएटर, सँडविच थिएटर, थ्रस्ट सिटींग आणि फोर साईड अरेना सिटींग अशा चार विविध पद्धतीने रंगमंचाची रचना येथे करता येणे शक्य होणार आहे. एका वेळी १४० ते २०० नागरिकांना याठिकाणी नाटके, कार्यशाळा, सांस्कृतिक व कला विषयक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल. प्रामुख्याने कार्यक्रम, नाटकासाठी हवी तशी रचना करण्याची सोय, त्यासाठी सुयोग्य अशी उंची, प्रकाशव्यवस्था (विशेष लाईटची ग्रीड), ध्वनिशास्त्राचा विचार करून डिझाईन केलेली ध्वनी यंत्रणा आदींचा समावेश येथे आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या या रंग अवकाशात पार्किंगची उत्तम सोय असणार आहे हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा उच्चांक: दिवसभरात नवीन ५७२० पॉझिटिव्ह रुग्ण तर ४४ जणांचा मृत्यू

श्रीराम लागू रंग – अवकाश या प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटनासंदर्भात बोलताना शुभांगी दामले म्हणाल्या, “ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते गुरुवार दि १८ जानेवारी, २०२४ रोजी, सायं ४ वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असणार असून यानंतर नाटकाचे प्रयोग व इतर कार्यक्रमांसाठी श्रीराम लागू रंग – अवकाश नागरिकांसाठी खुले असेल.” या प्रकल्पामुळे भारतातील प्रायोगिक रंगभूमीचा नवा अध्याय सुरु होईल असा विश्वास देखील यावेळी दामले यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाची तांत्रिक माहिती देताना वास्तुविशारद माधव हुंडेकर म्हणाले, “पारंपरिक रंगभूमीच्या स्वाभाविक मर्यादा न मानणारे, या मर्यादांना छेद देणारे ‘ब्लॅक बॉक्स’ या संकल्पनेवर आधारलेले असे हे थिएटर आहे. रंगमंचाच्या रचनेची मोकळीक या ठिकाणी देण्यात आली असल्याने प्रकाश आणि ध्वनी व्यवस्थांची मोकळीक ही ओघानेच आली. रंगमंचीय रचना, ध्वनी आणि प्रकाश यांची अनेक आव्हाने या दरम्यान आली. मात्र, दिग्दर्शकाच्या कल्पनेप्रमाणे रसिकांना सर्वोत्तम असा दृक श्राव्य अनुभव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या प्रकल्पामध्ये केला आहे. परदेशात आपल्याला अशा प्रकारच्या रचना पहायला मिळत असल्या तरीही त्यासाठी महागडी व्यवस्था उभारलेली असते. येथे आपण स्वदेशी उपाय विकसित करून ते गरजेप्रमाणे डिझाईन केले आहेत हे विशेष. ध्वनीव्यवस्थेसाठी काटेकोरपणे पदार्थांची (मटेरिअल्सची) निवड केली असून रहदारी अथवा अगदी एसीच्या आवाजाचाही व्यत्यय येणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतल्या गेली आहे. प्रायोगिक रंगभूमीवर शक्यतो नसलेली सुसज्ज अशी ग्रीनरूम आणि कलाकारांना आवश्यक इतर सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. २५ बाय १३ मीटर इतक्या जागेत सदर थिएटर विस्तारले असून आपातकालीन परिस्थितीत  प्रेक्षकांच्या सुरक्षेसंबंधी सर्व बाबींचा विचार करून याची रचना करण्यात आली आहे 

अधिक वाचा  1977 पासून पवारांचा विलीनीकरणाचा इतिहास - चंद्रशेखर बावनकुळे

डॉ श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या रंग अवकाशाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या लॉबीमध्ये एक विशेष गॅलरी उभारण्यात येईल. यामध्ये डॉ लागू यांना मिळालेली पारितोषिके, त्यांनी काम केलेल्या १०० हून अधिक नाटकांची यादी, दृक श्राव्य माध्यमातून डॉ लागू यांविषयीची काही माहिती आणि नजीकच्या भविष्यात त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे यांचा समावेश असेल, असेही हुंडेकर म्हणाले. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love