#Nasiruddin Shah: राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने थिएटर का नाही?-ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा सवाल

Why not theater in the name of artists instead of political leaders?
Why not theater in the name of artists instead of political leaders?

Nasiruddin Shah | Shri Ram Lagoo Rang-Avkash: ज्यांनी रंगभूमीवर हयात वेचली, अशा रंगकर्मींच्या नावाने अगदी तुरळक नाट्यगृहे दिसतात. पण राजकीय नेत्यांच्या नावाने मात्र अनेक नाट्यगृहे आहेत, असे का? असा प्रश्न ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी केला. महाराष्ट्र कल्चरल सेंटर(Maharashtra Cultural Centre) आणि लागू परिवार (Lagu Family) यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाश (Shri Ram Lagoo Rang-Awkash)या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह(Nasiruddin Shah ) यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील(Tilak Road) हिराबाग चौक (Hirabaug Chowk) येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह (Jyotsna Bhole Auditorium) इमारतीच्या पहिला मजल्यावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

डॉ. श्रीराम लागू (Dr. Shriram Lagoo) यांच्या पत्नी दीपा लागू(Deepa Lagoo), मुलगा डॉ. आनंद लागू(Dr. Anand Lagoo), महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे(Maharashtra Cultural Centre) अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे(Dr. Mohan Agashe), कार्याध्यक्ष एस. पी. कुलकर्णी(S.P. Kulkarni), सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह(Ratna Pathak Shah) आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सेंटरचे सचिव राजेश देशमुख (Rajesh Deshmukh), खजिनदार शुभांगी दामले(Shubhangi Damale), सभासद व अनेक कलाकार मंडळी देखील याप्रसंगी उपस्थित होती. 

अधिक वाचा  पुणे शहरातील 7 हुक्का पार्लरवर कारवाई

यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, “राजकीय नेत्यांच्या नावे नाट्यगृहे, हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील चित्र आहे. गिरीश कर्नाड (Girish Karnad), शंभू मित्रा(Shambhu Mitra), तन्वीर हबीब(Tanveer Habib), पं. सत्यदेव दुबे (Satyadeo Dube) कुणाच्याही नावाने थिएटर नाही, ही वस्तुस्थिती एक रंगकर्मी म्हणून मला खटकते. रंगभूमीच्या जन्मस्थानी महाराष्ट्रात फक्त बालगंधर्व आणि डॉ. घाणेकर यांचे अपवाद वगळता रंगकर्मींच्या स्मृतींचे थिएटर नाही.”

पुण्यात मात्र आज डॉ. लागू यांच्या नावाने हा नवा रंग अवकाश सुरू झाला आहे, त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याने मी सन्मानित झालो आहे. हा नवा रंग – अवकाश म्हणजे रंगकर्मींचे दुसरे घर होवो, असेही ते म्हणाले.

“डॉ. ‌लागू यांचे काम राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना प्रथम पाहिले.‌ १९७१ चा तो काळ होता. ‘आधेअधुरे’ या नाटकातील त्यांचे काम पाहून माझा श्वास थांबला की काय, असे वाटत होते. आवाजाचा लवचिक वापर, डोळ्यातले भाव, सहजता, भावनांवरील कमालीचे नियंत्रण… सर्वच विलक्षण होते. मी त्यांची ‘गिधाडे’, ‘कस्तुरीमृग’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके तसेच ‘सामना’ हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि ‘नाही’ असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो, असेही नसीरुद्दीन शाह म्हणाले.

अधिक वाचा  दिलासादायक:आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या होतेय कमी The number of corona patients in Pune has been declining for the last eight days

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “नव्या रंगकर्मीसाठी अनुकूल परिस्थिती भोवताली नसताना हा नवा रंग अवकाश उपलब्ध होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. स्वतः नसीरुद्दीन शाह आपल्या नाट्यप्रयोगाने या रंग अवकाशाची सुरुवात करत आहेत, यासारखे औचित्य नाही.” श्रीराम लागू आणि नसीरुद्दीन शाह यांना बदलत्या युगातील ‘थिएटर लॉयलिस्ट’ म्हणता येईल असे सांगत डॉ आगाशे पुढे म्हणाले, “श्रीराम लागू आणि नसीरुद्दीन शाह या दोघांनी कितीही इतर गोष्टी केल्या तरी त्यांचे संपूर्ण मन हे केवळ थिएटर मध्येच आहे. डॉ लागू यांनी शेवटपर्यंत रंगभूमीवर काम केले तर कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता नसीरुद्दीन अजून कार्यरत आहे. आज याच थिएटरच्या कामासाठी हे दोघे एकत्र आले आहेत हा दुर्मिळ आणि आनंदी योग आहे.” आज यांच्यासारख्या कलाकारांच्या प्रजाती या नष्ट होत चालल्या आहेत, असेही डॉ आगाशे यांनी सांगितले. 

अधिक वाचा  रोटरी क्लब स्कॉन प्रो आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

डॉ आनंद लागू यांनी यावेळी श्रीराम लागू रंग – अवकाशचे महत्त्व विशद करीत हे उभारण्यामागील कल्पना सांगितली. शुभांगी दामले यांनी सुदर्शन रंगमंच, जोत्स्ना भोळे सभागृह ते ‘ब्लॅक बॉक्स’ या संकल्पनेवर आधारित श्रीराम लागू रंग – अवकाशाचा प्रवास विशद केला. राजेश देशमुख यांनी निवेदन केले तर किरण यज्ञोपवीत यांनी आभार मानले.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love