संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताह व नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपरी(प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा सप्ताह आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.     

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, श्री गणेश नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय गणपत जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सुरेश कदम, श्री. लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम, सुरेश धाडीवाल, ह.भ.प. अर्जुन शिंदे, भंडारा डोंगर ट्रस्टचे जगनाथ नाटक पाटील, मुकुल तापकीर, अभिषेक जगताप, तसेच कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पिंपळे गुरव-नवी सांगवी परिसरातील अनेक महिला भजनी मंडळे आदी उपस्थित होते.  

अधिक वाचा  जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते

ह.भ.प. धर्माचार्य ऍड. शंकर महाराज शेवाळे आपल्या अनुभवसंपन्न विचारवाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 12 ते 19 सप्टेंबर दरम्यान संपन्न झालेल्या या कथा सप्ताहात ज्ञानेश्वरी एकानाथकडून समाजाकडे, ज्ञानदेव पूर्व इतिहास, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, विठ्ठल रुक्मिणी जलसमाधी, रेड्या मुखी वेद बोलविला, ज्ञानेश्वरीचा नेवासे येथे जन्म, ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आदी विषयावर विचार व्यक्त केले. काल्याच्या कीर्तनाने कथा सप्ताहाची सांगता झाली.

नोकरी महोत्सवात 1955 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील नामांकित सहभागी 35 कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जागेवर उमेदवारांची मुलाखत घेऊन 900 जणांना जॉइनिंग लेटर दिले. यामध्ये पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवीतील तरुण, तरुणी, महिलांना प्राधान्य देण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love