पुणे -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, २ महिने हातात आहे. २ महिन्यांनंतर अधिवेशन आहे. राज्यपालांनी सांगूनही निवडणूक घेतली असती तर तो आमचा असमजुतदारपणा दिसला असता. मात्र काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा काय असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. बहुमत असतानाही त्यादिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, असंही ते म्हणाले.
राज्यपालांनी बदल घटनाबाह्य असं सांगितलं. त्यावर आम्ही टोकाची भूमिका न घेता बहुमत असतानाही त्यादिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना भेटणार आहोत. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करु. घटनातज्ज्ञांचाही सल्ला घेऊ. आम्हाला त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यात आले होते. पत्रातील भाषेबद्दल राज्यपालांनी पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर अजित पवार म्हणाले, राज्यपाल यांना जे पत्र पाठवण्यात आलं होतं, त्यात घटनात्मक बाबी उपस्थित करण्यात आल्या. बहुमत असताना देखील आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही त्यादिवशी घेतली नाही. आम्हाला ती निवडणूक घेता येत होती. पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नव्हता. ते महत्त्वाचं पद आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे. आम्ही सर्व प्रमुख नेते भेटून त्यांना समजावून सांगू आणि यात तज्ञांचा देखील सल्ला घेऊ, असे ते म्हणाले.