ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर केला सोमय्यांचा सत्कार : जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे शक्तिप्रदर्शन

राजकारण
Spread the love

पुणे- जम्बो कोवीड सेंटरच्या भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या शनिवारी महापालिकेत असताना शिवसैनिकांनी सोमय्या यांना महापालिकेतील कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्या यांनी ते घेण्यास नकार दिल्याने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उडालेल्या गोंधळात झालेल्या धक्काबुकीत सोमय्या हे इमारतींच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यात जखमीही झाले होते.आज (शुक्रवार) सोमय्या पुन्हा महापालिकेत आले. यावेळी भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते पालिकेच्या पायरीवर मोठ्या संख्येने जमले होते. सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दरम्यान सोमय्या ज्या जेथे पडले होते, त्याच पायऱ्यांवर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांचा सत्कार केला.

किरीट सोमय्या आठवडाभरापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळी पालिकेत जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचबाचीवेळी सोमय्या पालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना जबर मार लागला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी सोमय्या यांनी पुन्हा पालिकेत येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान दिलं होतं. यानिमित्ताने भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच सत्कार कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध दर्शिवल्याने महापालिका परिसारात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे सकाळपासून नागरिकांना पालिका भवनात सोडणे बंद करण्यात आले होते. महापालिकेच्या सर्व प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त तैनात होता. कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात नव्हता.

पालिकेत आलेले सोमय्या गाडीतून खाली उतरण्यापूर्वीच सभागृहनेते गणेश बिडकर व सोमय्या यांची  काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर सोमय्या यांची गाडी प्रवेश गेटने पक्ष कार्यालयाकडे गेली. शिवाजी रस्त्यावरच सोमय्या यांनी आपली गाडी सोडली व ते गराड्यात गेले.  तेथे घोषणाबाजी झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या गराड्यात पालिकेकडे पायी निघाले. यावेळी पोलिसांनी मज्जावर करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते व पोलिस यांच्या मोठ्या प्रमाणात रेटारेटी झाली. या रेटारेटीचा तांगलाच फटका सोमय्या यांनाही सहन करावा लागला. शेवटी पोलिसांचे कडे व बॅरीकेट्स तोडून सोमय्या व कार्यकर्ते घोषणाबाजी व रेटारेटी करत पालिरा परीसरात पोहचले. रेटारेटीमुळे सुरक्षा रक्षकांनी सोमय्या यांना हिरवळीवरूनही सोमय्या महापालिका भवनाच्या पायऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या गोंधळात व रेटारेटीतच पोहचले.

सोमय्या पायऱ्यावर पोहचल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू केला. कार्यकर्त्यांच्या रेटा रेटीतून वाट काढत सोमय्या भवनात गेले. पायऱ्यावर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. काही वेळीने सोमय्या पून्हा पायऱ्यावर आले. शहराध्यक्ष मुळीक यांनी ते जेथे पडले होते, तेथेच त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार समज राऊत यांच्यावर टिका केली. नंतर ते आयुक्तांना  भेटण्यासाठी आत गेले.

सोमय्या पालिकेत येणार म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या येणार म्हटल्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवक पालिकेच्या पायरीवर जमले होते. सोमय्या येताच कार्यकर्त्यांचा उत्साह अनावर झाला. त्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. ठाकरे सरकार हाय हाय’, ‘जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद’, ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय’, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून सोडला.

महापालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या पोलिसांनी सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये म्हणून कडं केलं आणि त्यांना पालिकेत घेऊन गेले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा पारा अधिकच चढला. त्यांनी अधिकच जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

सोमय्यांना पालिकेत नेलं तरी भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केली. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी सोमय्या आले. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणा सुरू झाल्या.

भाजप कार्यकर्त्यांनी हे शक्तीप्रदर्शन केलेलं असतानाच पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते काही बधले नाही. सोमय्या आल्यावर त्याच पायऱ्यांवर भाजपच्या शहराध्यक्षांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *