माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट होता : किरीट सोमय्या : संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच

राजकारण
Spread the love

पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या आठवडाभरापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळी पालिकेत जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचबाचीवेळी सोमय्या पालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना जबर मार लागला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी सोमय्या यांनी पुन्हा पालिकेत येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान दिलं होतं. आज (शुक्रवार) ते महापालिकेत आले तेव्हा ते धक्काबुक्कीत ज्या पायऱ्यांवर पडले होते त्याच पायऱ्यांवर भाजपने शक्तिप्रदर्शन करून त्यांचा सत्कार केला. त्यावेळी बोलताना, “माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट होता, असा आरोप सोमय्या यांनी केला.” तसेच हिंमत असेल तर ठाकरे सरकारने माझ्या आरोपांची उत्तरे द्यावीत असं आव्हानच त्यांनी केलं.

दरम्यान, आज जो पोलीस बंदोबस्त होता,त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी १०० गुंड पाठवले होते. पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना दिसत नाही का? त्यांना अटक का झाली नाही?,” अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केला. हत्येचा प्रयत्न झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच असे म्हणत  पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. असं आव्हान सोमय्या यांनी दिले.

उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीवर पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही. संजय राऊतांच्या मित्र या कंपनीत भागीदार आहेत म्हणून कारवाई केली नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड सेंटरमध्ये भष्ट्राचार करून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचे पाप केलं, असं ते म्हणाले.

“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, “माझी संपत्ती त्यांनी काय असेल ती घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे,” या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सोमय्या म्हणाले, मराठी माणूस म्हणून मराठींना लुटायचं, त्यांची हत्या करायची. डेकोरेटला पकडून आणलं वैगैरे आरोप करतात. मुलीचं लग्न करा आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही म्हणता डेकोरेटला पकडून आणलं. तुम्ही डेकोरेटला काय ते २५, ५० लाख पैसे दिल्याचं बिल असेल तर मीडियासमोर दाखवा,” असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *