सॉलिडरीडाड एशिया आणि सीआरबी हवामान बदलाशी सामना करण्यासाठी रिजेनॅग्री कॉटन अलायंसची स्थापना करणार

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

नागपूर : सॉलिडरीडाड एशिया आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझिनेस (सीआरबी) हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना – रिजेनॅग्री कॉटन अलायंस  हिची स्थापना करण्यास सज्ज झाले आहेत. भारतात पुनरुत्पादक शेतीच्या प्रथांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. अशा प्रथांचे अनुसरण केल्यास २०३० पर्यंत किमान १० लाख टन ग्रीनहाऊस वायूंचे (जीएचजी) उत्सर्जन टळेल आणि भारतातील विविध भागीदारी प्रकल्पांच्या माध्यमातून ५ लाख अल्पभूधारक शेतकरी आणि व्यापक शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारेल, असा अलायंसचा अंदाज आहे. याद्वारे ब्रँड आणि किरकोळ खरेदीदारांकडून शाश्वत कापूसखरेदीच्या दिशेने सकारात्मक बदल होतील आणि त्यातून नेट-झीरो उत्सर्जन गाठण्यात त्यांना मदत होईल, अशीही अपेक्षा आहे.

सीआरबी आणि सॉलिडरीडाड एशिया हे प्रत्यक्ष जमिनीवरील परिणामकारक आणि सर्वसमावेशक कार्यक्रमांसाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे पुनरुत्पादक शेती अधिक व्यापक भूभागात आणि सर्व पिकांपर्यंत नेण्यासाठी ते  हातमिळवणी करत आहेत. याची सुरूवात कापसाने होत आहे. ‘रिक्लेम टू रिजनरेट: टूवर्ड्स रिजनरेटिव्ह कॉटन सेक्टर इन इंडिया’ या कार्यक्रमात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हॉटेल ल मेरिडियन, नागपूर, येथे या अलायंसची सुरुवात होत आहे. या अलायंसच्या माध्यमातून मूल्य शृंखलेतील सर्व भागधारकांमध्ये सहकार्याच्या एका नवीन व अधिक सुव्यवस्थित स्वरूपामुळे कृषी पद्धतींमध्ये आवश्यक बदल घडून येतील, असा सॉलिडरीडाड आणि सीआरबीला विश्वास आहे. यांमध्ये शेतकरी समूह, जिनर्स, व्यापारी, खरेदीदार आणि ब्रँड तसेच कृषी आणि वस्त्रोद्योग अधिकारी यांचा समावेश आहे.

नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग या भारत सरकारच्या उपक्रमाशी सुसंगत अशा अंमलबजावणी कृतींना आधार देणे हे रिजेनॅग्री कॉटन अलायंसचे (आरसीए) उद्दिष्ट आहे. कृषी उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हवामान बदल व जैवविविधतेची हानी यांच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय मिशन अंतर्गत भारतीय नैसर्गिक कृषी पद्धती कार्यक्रमासोबत अलायंसच्या योजना एकत्रपणे राबविण्यासाठी सॉलिडरीडाड आणि सीआरबी हे सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

सॉलिडारिडाड आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझनेस सहभागींना दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि त्यांना नवीन आणि नाविन्यपूर्ण चांगल्या शेती पद्धतींबद्दल शिक्षित आणि अद्ययावत  करण्यासाठी प्रोत्साहित करते. सहभाग आणि नावनोंदणीसाठी कृपया खालील लिंक संलग्न करा: https://forms.gle/Jmwx6FqY1MR6FfPS9

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *